पोस्ट्स

जानेवारी ११, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

93व्या साहित्य संमेलनामुळे मनात उमटलेले भावतरंग

इमेज
                  दिनांक 10 जानेवारी 2020ला उस्मानाबाद येथे  93व्या साहित्य संमेलनाचे उदघाटन झाले . मला कळायला लागल्यापासूनचे हे 15/16संमेलन . मी नाशिकला वनप्रेमी असणारे ज्येष्ठ साहित्यिक  मारुती चितमपल्ली हे  संमेलाध्यक्ष असणारे साहित्य संमेलन आणि पुण्यात सर परशुराम भाऊ महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेले साहित्य संमेलन  ही दोन संमेलने अगदी जवळून त्यातील कार्यक्रमांच्या आस्वाद घेत अनुभवली . बाकीच्या साहित्य संमेलनांच्या कार्यक्रमांच्या प्रसार माध्यमांनी केलेल्या  बातम्यांच्या स्वरूपात अनुभवली . माझ्या मते या सर्व साहित्य संमेलनांमध्ये  होणारे वाद , (ज्यामध्ये साहित्य क्षेत्राशी प्रत्यक्ष संबंध असणारे आणि साहित्य क्षेत्राशी अप्रत्यक्षरित्या संबंधित असणारे दोन्ही वाद मला अपेक्षित आहेत ) त्यावर विविध लोकांची मते , या संमेलनाच्या आयोजनावरून  ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे सारख्या व्यक्तीची मते,  . यासाठी सरकारतर्फे देण्यात येणारे अनुदान , त्यावरून उठणारे वादंग , या सर्व साहित्य संमेलनात होणारे ठराव, त्याची  प्रत्यक्षात होणारी अंमलबाजवणी , या संमेलनात होणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम