पोस्ट्स

जानेवारी ७, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

हिवसाळ्याचा निमित्ताने

इमेज
आज गुरुवार  दिनांक 2021 जानेवारी 7 रोजी नाशिकमध्ये भर दुपारी सुमारे दिडतास मुसळाधार पाउस झाला. याआधी डिसेंबर 2020 मध्ये पाउस पडला होता,त्यामुळे "नाशकात हिवसाळा हा ऋतू सुरु झाला आहे' , 'स्वेटर घालावा की रेनकोट असा प्रश्न नाशकातील हवामानामुळे निर्माण झाला आहे, अश्या आशयाचे मेसेज सोशल मिडियामध्ये  वेगाने फिरु लागले.  विनोदासाठी या प्रकारचे मेसेज उत्तम असले तरी पर्यावरणाचा प्रश्न किती गंभीर बनला आहे. याची  साक्षच हा पाउस देत आहे.              हवामानबदलामुळे 2020साली सर्वाधिक हानी पोहलेल्या देशांमध्ये भारताचा क्रमांक पहिला आहे, अशा अहवाल नुकताच सयुंक्त राष्ट्रसंघातर्फे प्रसिद्ध करण्यात आला आहे, त्या पार्श्वभूमीवर बघीतल्यास या पावसाचे गांभीर्य लक्षात येते.पाश्चात्य देशातील निवडणूकांमध्ये राजकीय पक्षांच्या जाहिरनाम्यात हवामान बदल हा विषय असतोच, आपल्याकडे काय विषय असतात? हे आपण जाणतातच.नाही म्हणायला शालेय आणि महाविद्यलयीन स्तरावर आपणाकडे पर्यावरण हा विषय शिकायला असतो, मात्र त्याचे अपेक्षीत परीणाम साध्य होतात का ? हे ही आपणास माहिती आहेच. काही जागरुक नागरीक याबाबत सातत्याने प्रयत्न

समर्थकांसाठी समर्थकांकरवी..समर्थकांचा राडा

इमेज
                         लोकशाही म्हणजे लोकांसाठी, (for the by people)लोकांकरवी , (by the people) लोकांच्या मार्फत  (of the people) चालवण्यात येणारी शासनव्यवस्था  होय, अशी लोकशाहीची व्याख्या अमेरीकेचे प्रसिद्ध अध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी केली होती. मात्र लवकरच ही व्याख्या आपलेच वारसदार समर्थकांसाठी, समर्थकांकरवी, समर्थकांच्या मार्फत चालवण्यात येणारी शासनव्यवस्था असी बदलतील, अशी त्यांना कल्पना नसेल.अब्राहम लिंकन यांना अनपेक्षीत असणारी ही घटना अमेरीकेत 2021  जानेवारी 6 रोजी घडली, ज्यात हे लेखन करेपर्यत 4 निष्पापांना आपल्या प्राणास मुकावे लागले आहे. आधूनिक जगाचा विचार करता, पहिल्या काही लोकशाही असणाऱ्या अमेरीका या  देशात ही लोकशाहीची हत्या करण्याची घटना घडली आहे.           निवडीच्या प्रक्रीयेतील काही तरतूदींच्या आधारे, जनाधार असणाऱ्या विरोधी पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांना पराभूत करून, सत्तेच्या सर्वोच्च स्थानी असणाऱ्या पोहोचणाऱ्या,  डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कोलांटी उडी घेत, ज्या प्रतिनिधीच्या संख्येमुळे ते निवडून आले, त्याला सोडचिठ्ठी देत, जनमताचा राग आळवला आहे.  परीणामी अमेरीकेत भ