पोस्ट्स

डिसेंबर १, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पाकिस्तानात सध्या चाललंय तरी काय ?

इमेज
  पाकिस्तानात सध्या चाललंय तरी काय ? अस  प्रश्न उपस्थित व्हावा . अश्या घडामोडी सध्या पाकिस्तानात घडत आहेत . पाकिस्तानचे नवनियुक्त लष्करप्रमुख असिफ मुनीर हे पदाची सूत्रे हाती घेऊन २४ तास होत नाही तोच पाकिस्तातनने दहशतवादी संघटना म्हणून  जाहीर केलेल्या तेहरीके तालिबाबान पाकिस्तान या संघटनेकडून  शस्त्रबंदी मागे घेत असल्याचेआणि यापुढे सर्व पाकिस्तानात दहशतवादी हल्ले करणार असल्याचे जाहीर करण्यात आले ते नुसते जाहीर करून थांबले नाहीत तर पुढच्याच दिवशी पाकिस्तानमधील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जवळपास देशाच्या क्षेत्रफळाच्या ५० % क्षेत्रफळ असलेल्या बलुचिस्थान प्रांताची राजधानी असलेल्या क्वेटा शहरात एका बॉम्बस्फोट देखील केला ज्यामध्ये एका पोलिसासह एकूण ४ जणांना प्राणास मुकावे लागले . बॉम्बस्फोटात  मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची संख्या कमी असली तरी नवीन लष्करप्रमुखांच्या पुढे कोणते आव्हान आहे ? याची हि चुणूकच म्हणावी लागेल . पाकिस्तानातील लष्कराची तेथील राजकारणावर आणि प्रशासनावर मोठी पकड आहे पाकिस्तानी लष्कराच्या संमतीशिवाय तिथे कोणताही पंतप्रधान राज्य करू शकत नाही हे बघता पाकिस्तानी लष्कराला असे आव

प्रखर राष्टवादाचा बळी चीन

इमेज
     गेल्या काही दिवसापासून चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या कोव्हीड १९ चा प्रतिबंध करण्यास लादण्यात आलेल्या  लॉकडाऊनला  विरोध करण्यासाठी चीनमधील नागरिक रस्त्यावर उतरल्याचा बातम्या न्यूजचॅनेलवर येत आहेत. १९८९ जून ३ रोजी बीजिंगमध्ये झालेल्या तियान्मेन चौकातील हत्याकांडाच्या वेळी ज्या प्रकारचे आंदोलन झाले होते त्या प्रमाणे मोठ्या प्रमाणत आंदोलन सुरु असल्याचचे या बातम्यांमधून सांगण्यात येत आहे . चीनमध्ये माध्यमांवर प्रचंड बंधने आहेत तिथून सरकारविरोधी कोनतिकच बातमी बाहेर जात नाही त्यामुळे अनेकदा त वरून ताकभात या प्रमाणे तेथील बातम्यांवरून अंदाज बांधत परिस्थितीची कल्पना करावी लागते . ज्यामध्ये काहीवेळेस वास्तवात असणाऱ्या परिस्थितीपेक्षा भयानक कल्पना केली जाऊ शकते ज्यामुळे तियान्मेन चौकातील हत्याकांडाच्या वेळी ज्या प्रकारचे आंदोलन झाले होते त्या प्रमाणे मोठ्या प्रमाणत आंदोलन सुरु असल्याची बातमी देखील कल्पना परिस्थितीपेक्षा गंभीर असे असू शकेल मात्र तसे नसल्यास परिस्थिती आणि त्याच्या बातम्या यात फारसा फरक नसल्यास स्थिती अत्यंत गंभीर आहे असे आपण म्हणू शकतो याही वेळेस हि स्थिती सोशल मीडि