पोस्ट्स

मे ४, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ओळख एका वन कथा संग्रहाची

इमेज
              मारुती चितमपल्ली....... पेशाने वनखात्यात वरिष्ठ पदावर कार्यरत असणारे मराठीतील नामवंत साहित्यिक . अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी संमेलनाध्याक्ष . जंगले आणि त्यातील समाजजवीन तसेच  प्राणीजीवनावर आधारित साहित्य जगविख्यात आहेत . त्यांच्या \प्रसिद्ध असणाऱ्या साहित्यामध्ये "केशराचा पाऊस " या कथासंग्रहाचा बराच वरचा क्रमांक लागतो . सध्याच्या लोकडाऊनच्या काळात मी ते पुस्तक   नुकतेच वाचले .                           पुस्तकात त्यांच्या नोकरीच्या कार्यकाळाळतील आठवणी कथारूपाने सांगण्यात आलेल्या आहेत . पुस्तकात 16कथा असून पहिल्या दोन कथांमध्ये अनेक प्रकरणे आहेत .  पुस्तकाची भाषा संवादी असल्याने पुस्तक जरी माहितीविषयी असले तरी पुस्तक वाचणे कंटाळवाणे न होता ज्याला  ज्ञानवर्धक (  INFOTAINMENT ) म्हणता येईल असे झाले आहे .सदर पुस्तकामध्ये त्यांनी स्वतःचा उल्लेख माधव असा केला असून . या कथासंग्रहातील कथांमध्ये सुरवातीच्या 9 कथांमध्ये नायका बरोबर त्याची नायिका "सुमित्रा  यांच्या भावविश्वाचा आधार घेत लेखक मेळघाटातील वनांची तेथील प्राण्यांची वैशिष्ट्ये अलगदपणे उलगडली आहेत