पोस्ट्स

जानेवारी १२, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्वामी विवेकानंदांना अपेक्षित तरुणाई आणि वस्तुस्थिती

इमेज
         आज 12 जानेवारी अर्थात स्वामी विवेकानंदांची जयंती,  अर्थात  राष्ट्रीय युवा दिन . आज दिवसभरात स्वामीजींच्या आयुष्यावर आधारित विविध कार्यक्रम होतील . त्यांच्या कार्याचे गोडवे गायले जातील . मात्र स्वामी विवेकानंद ज्या तरुणाईच्या बळावर आपल्या भारताला गतवैभव प्राप्त करून देणार होते , तिची आजची स्थिती स्वामी विवेकानंदांना अपेक्षित असणारी आहे का ? याचा विचार करता समोर येणारे चित्र फारसे आशादायक नाही असेच खेदाने म्हणावे लागेल . माझे आजचे लेखन त्यासाठी . स्वामी विवेकानंदानी आपले सर्वस्व त्यागून भारताच्या प्रगतीसाठी झटणाऱ्या तरुणाईचे स्वप्न बघितले होते . त्यासाठी त्यांनी प्रसंगी आपल्या देवदेवतेचा त्याग करून भारतमाता हीच आपली देवता मानून तिची सेवा करण्याचा विचार देखील मांडला होता .                         दोन दिवसपूर्वीच एका मराठी वृत्तवाहिनीवर एक बातमी दाखवली होती , ज्यात सांगितले होते की , गेल्या वर्षभरात सुमारे दीड हजार तरुणांनी ( मला येथे  भाषेमुळे लिंगभेद करावा लागत आहे . मी जरी पुरुष लिंगाचा उल्लेख करत असलो तरी मला तरुण आणि तरुणी दोन्ही अपेक्षित आहेत . )विविध कारणांनी आत्महत्या