पोस्ट्स

ऑक्टोबर २७, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारतीय रेल्वेची चित्याचा वेगाने बदलाकडे धाव

इमेज
                  आपली भारतीय रेल्वे सध्या झपाट्याने बदलत आहे, हे आपण जाणतातच. या बदलांचा मालिकेतीलच पुढचा अध्याय म्हणून समजता येतील, असे  प्रवास्यांशी सबंधित  तीन बदल  रेल्वे आपल्या सेवेत  करणार असल्याचे, सुतोवाच नुकतेच रेल्वेमार्फत करण्यात आले. एक बदल काहीसा सकारात्मक आहे, तर एका बदलाला काहीसी नकारात्मक छटा आहे.  तर एक न्युट्रल आहे. मुख्य प्रवाहातील माध्यमांनी यावर काहीसे मौन बाळगले असल्याने त्याची माहिती देण्यासाठी आजचे लेखन. पहिले नकारात्मक बदल बघूया . तर मित्रांनो आपल्या प्रवासात आपली तहानभूक मिटवणारा रेल्वेडब्बा म्हणजे पँट्री कार बंद करणार असल्याचे संकेत रेल्वेने दिले आहेत. भारतीय रेल्वेच्या तिन्ही कोच फँक्टरीमध्ये (इंट्रीग्रेड कोच फँक्टरी चेन्नई, रेल कोच फँक्टरी रायबरेली, आणि रेल कोच फँक्टरी कपूरथाळा या तिन ठिकाणी भारतीय रेल्वेच्या प्रवाशी डब्याची निर्मिती होते)   या प्रकारचे डब्बे बऱ्याचा काळापासून बनत नसल्याचे दिसून आल्याने ही बाब उघडकीस आली. सध्या प्रवाशी सहजतेने आँनलाईन पद्धतीचा अवलंब करत प्रवाश्यात अन्न मागावू शकतो, आणि या प्रकारच्या डब्यांमार्फत पुरवण्यात येणाऱ्या अन्नांचा