पोस्ट्स

मार्च २, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पाकिस्तानी अर्थव्यवस्थेचा पाय खोलात

इमेज
       पाकिस्तानमधून येणाऱ्या बातम्यांकडे नजर टाकल्यास , अर्थव्यवस्थेचा पाया  दिवसोंदिवस खोलात जात असल्याचे  दिसून येत आहे / आंतराष्ट्रीय नाणेनिधीकडून मदत मिळण्यासासाठी तेथील केंद्रीय सत्ता नैसर्गिक इंधनाचे दर सातत्याने वाढवत असताना वाढती महागाई नियंत्रांत आणण्यासाठी तेथील मध्यवर्ती बँकेने तेथील व्याजदर  ३ ५ने वाढवले आहेत ज्यामुळे तेथील व्याजदर २५ % झाले आहेत त्यामुळे पाकिस्तानात कोणी बँकेचे कर्ज घेऊन व्यवसाय करणे निव्वळ अशक्यप्राय झाले आहे आंतराष्ट्रीय नाणेनिधीकडून निधी मिळवण्यासाठी या प्रकारचे पाऊल टाकल्याचे सांगण्यात येत आहे २ मार्च रोजीअमेरिकी डॉलरचा भाव २८५ पाकिस्तानी रुपया होता जो २ मार्च या एकाच दिवसात १९ रुपयांनी वाढला इम्रान खान यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागले त्यावेळी अमेरिकी डॉलरचा भाव १७८ रुपये होता इम्रान खान यांच्या साडेतीन वर्षात अमेरिकी डॉलर पाकिस्तानी रुपयाचा विचार करता ५० रुपयांनी वाढला होता तर इम्रान खान हे प्रमुख विरोधी पक्षनेते असतांनाचा १० महिन्यात पाकिस्तानी रुपया अमेरिकी डॉलरचा तुलनेत १०७ पाकिस्तानी रुपयांनी घसरला आहे यावरून पाकिस्तानी अर्थव्यवस्थेच्या घसरणी