पोस्ट्स

जानेवारी ११, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

राष्ट्रीय भुगोल दिनाच्या निमित्याने -

इमेज
भूगोल आपल्यापैकी अनेकांचा शालेय स्तरावरील नावडता विषय . . मात्र हा विषय आपल्या जीवनात अत्यंत उपयुक्त असणारा विषय आहे   . आपण भूगोल विषयाशी पूर्णपणे बांधली गेलो आहे . मराठवाडा हा मागास का आहे ? जागतिक राजकारणात काश्मीरचे महत्व मोठ्या प्रमाणवर का आहे ?    राजस्थान आणि गुजरात या राज्यातील व्यक्ती मोठ्या प्रमाणात व्यवसायात का आहेत ? पंजाबला धान्याचे कोठार म्हणून का ओळखले जाते   ? सिंगापूर या देशाने अल्पावधीत प्रचंड प्रगती कशी काय केली ? सध्या मोठ्या प्रमाणत चर्चिला जाणारा जोशी मठाचा प्रश्न मुळात का निर्माण झाला अश्यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे ही आपणस भूगोलाच्या विविध उपशाखांच्या अभ्यासाने समजतात ,       भूगोलाच्या विविध शाखा आहेत . जसे राजकीय भूगोल ( political geography   ) वस्ती भूगोल (settlement geography ) हवामानशास्त्र (climatology ) आर्थिक भूगोल (economic geography ) लष्करी भूगोल (military   geography ) वगैरे . मात्र शालेय   अभ्यासक्रमात फक्त राजकीय भूगोलाचाच विचार करण्यात