पोस्ट्स

जून ११, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बातमीतील पाकिस्तान (भाग 6)

इमेज
  आपल्या भारतात मान्सुम आणि कोरोना विषयक बातम्यांनी माध्यमे ओसाडून वहात असताना पाकिस्तानमध्ये तीन घडामोडी घडल्या आहेत.त्यातील दोन भारत पाकिस्तान याविषयी तर एक पाकिस्तान अफगाणिस्तान विषयक आहे. पाकिस्तान आपले शत्रू राष्ट्र आहे. पाकिस्तानची अनेक महत्तवाची शहरे भारतीय सीमेपासून हाकेच्या अंतरावर आहेत. पाकिस्तानातील  प्रमुख 7 नद्यांपैकी काबूल या नदीचा अपवाद वगळता अन्य सर्व 6 नद्या भारतातून वहात जात पाकिस्तानी जनतेची तहान भागवतात. त्यामुळे आपणास त्या माहिती असणे आवश्यक आहे. चला तर मग त्यांचा विषयी माहिती करुन घेवूया.  पहिले भारताचा संदर्भ असलेल्या घडामोडी बघूया तर मित्रांनो भारत पाकिस्तान संदर्भात दोन घडामोडी घडल्या .त्यातील पहिले म्हणजे पाकिस्तानने अनिधिकृतपणे आपल्या नियंत्रणात ठेवलेल्या आझाद काश्मीरमध्ये विधीमंडळाच्या निवडणूकींची घोषणा केली आहे. 21 जून पर्यत उत्सुक उमेदवार उमेदवारी अर्ज भरु शकतात.अर्ज माघारी घेणे, मतदार यादी निश्चिती यासाठी 3 जूलै.हा दिनांक निश्चित करण्यात आला आहे. तर 25 जूलै रोजी 45 सदस्य संख्या असणाऱ्या आझाद काश्मीरसाठी मतदान होइल.या 45 मध्ये आझाद काश्मीरच्या नागरीकांसाठी

हळव्या मनाचा बाल साहित्य निर्मितीकार ... साने गुरुजी .

इमेज
आजकाल लहान मुले फारसी वाचत नसल्याची तक्रार सातत्याने करण्यात येते. या विषयावर चर्चा करताना काही जण आता मुलांना  वाचायला बालसाहित्य कुठे आहे? असा प्रश्न उपस्थित करताना दिसतात. या पार्श्वभूमीवर विपूल प्रमाणात बालसाहित्य निर्माण करणाऱ्या साने गुरुजींची आठवण आल्याशिवाय रहात नाही. आज 11 जानेवारी 2021 रोजी त्यांची 71वी पुण्यतिथी त्या निमित्ताने त्यांना भावपुर्ण आदरांजली .       साने गुरुजींचे श्मामची आई हे पुस्तक खुपच प्रसिद्ध असले तरी त्यांचे फारसे प्रसिद्ध नसणारे बालसाहित्य प्रचंड आहे. बालमनावर उत्तम संस्कार करत असतानाच त्यांचे मनोरंजन करण्याचे दुहेरी कार्य त्यांचा लेखनातून  उतरलेले सहजतेने दिसते. अनेकदा संस्काराचा नावाखाली मुलांना नकोसे वाटेल असे बोजड साहित्य मुलांचा माथी मारले जाते. किंवा मनोरंजनाखाली  काहीही संस्कार  करत नसलेले साहित्य त्यांचा माथी मारले जाते. दुसऱ्या प्रकारचे उत्तम उदाहरण म्हणजे पुस्तक स्वरुपात प्रसिद्ध झालेली कार्टून्स .तर पहिल्या प्रकारात विविध अध्यात्मिक प्रवचने देणाऱ्या पुस्तकांचा समावेश करता येईल. साने गुरुजींचे बालसाहित्य मात्र या दोन्ही टोकांचा ठिकाणी न जाता त्य