पोस्ट्स

जानेवारी १, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सन २०२२ मध्ये पुढील खगोलीय चमत्कार आपली वाट बघत आहेत

इमेज
           शुक्रवारी रात्री आपण नववर्ष स्वागत केले  कॊव्हिड १९ चे विविध नियम पाळत.  मागच्या वर्षातील कटू त्रासदायक आठवणी प्रसंगाला विसरत आपण नव्या वर्षाचे जोरदार स्वागत केले नव्या वर्षाबाबत आपल्या सर्वांना खूप उत्सुकता आहे पुढे येणारे वर्ष  कसे  असेल ? बाबत अनेकांना खूप उत्सुकता आहे त्यांना मी सांगू इच्छितो की , येणाऱ्या सन २०२२ मध्ये अनेक अनेक खगोलीय चमत्कार आपली वाट बघत आहे   खगोलीय चमत्काराची सुरवात वर्षातील तिसऱ्या  दिवशी अर्थात ३ जानेवारीपासून सुरु होत आहे या दिवशी आणि याच्या पुढच्या दिवशी म्हणजे ४ जानेवारी रोजी वर्षातील सर्वात मोठा उल्कावर्षाव आपली वाट बघत आहे या दिवशी तासाला सुमारे १२० उल्का या प्रमाणात उल्कावर्षाव होणार आहे ४ फेब्रुवारी रोजी पृथ्वी  आणि शनी यांच्यामध्ये सूर्य येणार आहे ज्यामुळे शनी ग्रह सूर्याच्या प्रकाश्यात लुप्त झाल्याने  आकाश्यात पुढील काही दिवस शनी हा ग्रह दिसणारा नाही {जोतिषीय भाषेत शनीचा अस्त होणार आहे ] ९ फेब्रुवारी रोजी शुक्र वर्षातील सर्वाधिक प्रखर दिसणार आहे मात्र त्यासाठी आपणस पहाटे उठावे लागणार आहे पाहते पूवेकडे मंगळ आणि बुधाच्यामध्ये शुक्राची चांदण