पोस्ट्स

फेब्रुवारी ४, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नैसर्गिक, ऐतिहासिक, आणि आध्यात्मिक गोष्टीनी समृद्ध तालुका संगमनेर

इमेज
                                                    आपल्या महाराष्ट्रात अनेक नैसर्गिक , ऐतिहासिक आणि आध्यत्मिक  गोष्टीनी समृद्ध अनेक स्थळे आहेत . ही स्थळे जर आपणास एकाच वेळी बघायची असल्यास, आपणास ज्या मोजक्या ठिकाणांना भेट देणे क्रमप्राप्त आहे, अश्या ठिकाणाची यादी केल्यास त्या यादीत अग्रक्रमाने नाव घ्यावेच लागेल, ते महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या जिल्ह्यात वायव्य दिशेला असणाऱ्या संगमनेर तालुक्याचे              . या तालुक्यातील पेमगिरी या गावात आपणास ऐतिहासिक आणि नैसर्गिक गोष्टींचा मिलाफ बघायला मिळतो , तर त्याच संगमनेर तालुक्यात असणाऱ्या खांडेश्वर आणि निर्झरेश्वर या ठिकाणी आपणास आध्यत्मिक गोष्टीचा प्रत्यय येतो . मी नुकतीच अश्या  नैसर्गिक, ऐतिहासिक,  आणि आध्यात्मिक गोष्टीनी समृद्ध तालुका असणाऱ्या संगमनेर तालुक्यात  माझ्या फेसबुक मित्रांच्या सहकार्याने नुकतेच फिरून आलो , त्यावेळी मला आलेले  अनुभव आपणापर्यंत पोहोचवण्यासाठी आजचे लेखन .                                मित्रानो ,  मी राहतो त्या नाशिकपासून हाकेच्या अंतरावर  संगमनेर तालुका आहे . मी नाशिक पुणे प्रवासामध्ये या तालुक्यातून प