पोस्ट्स

सप्टेंबर १, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

देशविरहित लोक ..........

इमेज
                   आपल्या महाराष्ट्रात विविध राजकीय नेते कोणत्या पक्षात जाणार ? याविषयीच्या बातम्या माध्यमांमध्ये हिरहिरीने दिल्या जात असताना,  देशाच्या एका टोकाला असणाऱ्या आसाम या राज्यात वेगळेच नाट्य रंगत आहे. प्रामुख्याने  बांगलादेशी घुसखोरांवर अंकुष ठेवण्यात येऊन गैरमार्गाने भारतात आलेल्या व्यक्तींना त्यांच्या देशात पाठवणे सोईचे व्हावे , या हेतूने  मूळ नागरिकांची ओळख  होण्याच्या दृष्टीने राबवण्यात आलेल्या " नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनशिप " या यादीत  सुमारे १९ लाख व्यक्तींची नावे  नसल्याने वेगळाच गोंधळ बघावयास मिळत आहे .                          ही यादी सुधारित आहे . सुमारे सहा वर्षे सरकारी यंत्रणांनी खपून ही यादी तयार केली आहे . या पूर्वी तयार केलेल्या यादीमध्ये सुमारे ४० लाख लोकांची नवे यादीतून वगळण्यात आली होती . त्यावर प्रचंड वादंग उठल्यावर हि सुधारित यादी तयार  करण्यात आली आहे . मात्र तिच्यातही प्रचंड चुका असल्याचा आरोप करण्यात येतोय . लष्करात आणि आसाम पोलीस दलात अनेक वर्षे सेवा बजवाल्यांची तसेच अनेक ज्यांच्या रक्ताच्या नात्यातील व्यक्तीची नावे यातून गहाळ झाली आहेत