पोस्ट्स

भारताचे शेजारी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

नेपाळमधील लोकशाही धोक्यात

इमेज
नेपाळ, भारताखेरीज हिंदू बहुसंख्य असलेला भारताचा शेजारी. भुतानखेरीज भारतीयांना कायमस्वरुपी व्हिसा फ्री प्रवेश असणारा देश हा नेपाळ सध्या मात्र राजकीय आंदोलनात गटंगळ्या खातोय. तस बघायला गेलो तर नेपाळमध्ये सध्या भारतासारखीच गणतांत्रीक लोकशाही व्यवस्था आहे ज्यामध्ये देशाचा प्रमुख हा लोकांमार्फत अप्रत्यक्षरीत्या निवडला जातो. मात्र ही व्यवस्था मोडीत काढत देशात सौदी अरेबिया सारखी घटनादत्त राजेशाही व्यवस्था असावी यासाठी  नेपाळमध्ये सध्या आंदोलन करण्यात येत आहे तसी या प्रकारची राजेशाही समर्थन करणारी आंदोलने नेपाळला नवी नाहीत या आधी अनेकदा या प्रकारची आंदोलने नेपाळमध्ये झालेली आहेत. मात्र सध्याचे आंदोलन या आधीच्या आंदोलनापेक्षा खूपच व्यापक आहे मागच्यापेक्षा अधिक नागरिक या आंदोलनात सहभागी झाली आहेत        2001 जून 3 रोजी नेपाळचा भावी राजा दिपेंद्र याने आवडत्या मुलीशी राजघराण्यातील व्यक्ती लग्न करु देत नाहीत, या रागातून राजपरीवाराच्या केलेल्या हत्येनंतर निर्माण झालेल्या पोकळीपासूनच नेपाळमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती.  त्या हत्याकांडानंतर राजा बनलेल...

भारतावर दूरगामी परिणाम करणारी घटना !!!

इमेज
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हशिण यांनी देश सोडला असून त्यांनी भारतमार्गे लंडनला प्रयाण केल्याचे आपणस एव्हाना माहिती झाले असेलच . बंगलादेशमध्ये लष्कराच्या मदतीने काळजीवाहू सरकार स्थापन कऱण्यात आले असून पुढील सरकार सत्ता स्थापन करेपर्यंत हे काळजीवाहू सरकार सत्ता सांभाळेलअसे या संदर्भात विविध माध्यमामध्ये सांगण्यात येत आहे . बांगलादेशमधील हा सत्ता बदल फक्त त्या देशासाठीच नव्हे तर आपल्या भारतासासाठी देखील अत्यंत महत्वाचा ठरणार आहे   . भारतासाठीचे बदल आपण  तीन   प्रकारात विभाजित करू शकतो . पहिल्या प्रकारात आपण ईशान्य भारताला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात , ईशान्य भारताचा उर्वरित भारताशी असणारा संपर्क वाढवण्यासंदर्भात सध्या   सुरु असणाऱ्या विविध उपाययोजना विचारत घेऊ शकतो . दुसऱ्या प्रकारात आपण भारत आणि बांगलादेश यांच्यात होणाऱ्या व्यापार आणि अन्य तरतुदींचा विचार करू शकतो.तर तिसऱ्या प्रकारात बांगलादेशातील अल्पसंख्याक समाजाचा विचार करु शकतो‌ ईशान्य ...

सिंहावलोकन २०२३भारताच्या शेजारील देशातील घडामोडी

इमेज
सध्या सुरु असणारे ग्रेनीयन कॅलेंडर वर्ष संपण्यास आता   मोजकेच दिवस राहिले आहेत . भौगोलिक दृष्ट्या आपल्या भारतीय कालगणेनुसार ज्या प्रकारचे बदल वर्ष संपताना आणि नवीन वर्ष सुरु होताना होतात तसे बदल जुने नविन कॅलेंडर वर्ष संपंतांना आणि नवीन ग्रेनीयन कॅलेंडर वर्ष सुरु होताना दिसत नसले तरी जगभरात आता   ग्रेनीयन कॅलेंडर वर्षचा सर्वाधिक प्रमाणात वापरले जात असल्याने वर्षाखेर म्हणून सरत्या वर्षाच्या आढावा घेयचा असल्यास तो आताच घेणे क्रमप्राप्त आहे चला तर जाणून घेउया या सरत्या वर्षात काय काय घडामोडी घडल्या हा आढावा मी क्षेत्रनिहाय घेणार आहे प्रत्येक क्षेत्राचा एक लेख असेल या लेखात   भारताचे शेजारी या क्षेत्रातील घडामोडी बघूया    भुतानचा अपवाद वगळता भारताच्या सर्वच शेजारी देशात यंदा मोठ्या प्रमाणात उलथापालथ झाली . श्रीलंकेत वर्षाच्या सुरुवातीला फेब्रुवारी महिन्यातच तेथील सरकारने वीजदर मोठ्या प्रमाणात वाढवले . मागच्या वर्षांपासून सामोरे जात असलेल्या आर्थिक ...