पोस्ट्स

ऑगस्ट ९, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भयानक वास्तवाची पुन्हा एकदा जाणीव !

इमेज
       मानवाचे हवामान बदल या संकटाशी लढण्याचे प्रयत्न तोकडे , अपुरे आहेत..याची जाणीव पुन्हा एकदा जाणीव मनुष्य प्राण्यास 9 आँगस्ट रोजी झाली.याला निमित्त होते,9 आँगस्ट रोजी प्रसिद्ध झालेला  आयपिसीसी अर्थात इंटर गव्हरमेंटल पँनेल फाँर क्लायमेंट चेंज या संस्थेचा आलेला हवामान बदलाविषयी मानवी बदलाविषयीचा अहवालाचा पहिला भाग..याचे दोन ते तीन भाग प्रसिद्ध  होतात. सन 1990 पासून आय पि सी सी कडून सातत्याने दर दोन ते तीन वर्षांनी अहवाल प्रसिद्ध करण्यात येतो. यंदा 16वा अहवाल प्रसिद्ध झाला. या अहवालात अनेक धक्कादायक बाबी सांगितल्या आहेत.  आपणास पुढील दशकात अनेकदा तीव्र प्रकारचा हवामानास सामोरे जावे लागेल. प्रचंड पूर , प्रचंड उष्मा, प्रचंड दुष्काळ  या प्रकारच्या हवामानाचा आपणास गेल्या काही वर्षांचा तूलनेत जास्त प्रमाणात सामना आगामी दशकात करावा लागेल. तसेच पुढील 30 नाही तर 20 वर्षातच आपणास 1.5 अंश सेल्यीयसने तापमान कमी करणे आवश्यक असल्याचे या अहवालामध्ये सांगण्यात आले आहे. (या आधीच्या अहवालात 1.5अंश सेल्यीयस तापमान कमी करण्यासाठी30 वर्षाची मर्यादा होती)       हा अहवाल पुर्णतः शास्त्रीय कसोट्यांवर आधारीत

वणव्याची शृंखला थांबेचीच ना !

इमेज
        आपल्याकडे एका सिमेंटचा प्रसिद्ध जाहिरातीमध्ये अबे ये दिवार तूटती क्यु नही? असे वाक्य आहे. याच वाक्यात बदल करत अबे ये आग बुझती क्यु नही?,असा प्रश्न उपस्थित व्हावा,असी स्थिती गेल्या दोन ते तीन आठवड्यापासून तूर्की आणि आता गेल्या आठवड्यापासून ग्रीस या देशात आहे. या देशात प्रचंड असा वणवा लागला आहे. जो तेथील सरकारच्या नियंत्रणाच्या बाहेर गेला आहे. या वणव्यामुळे हजारो लोकांना सुरक्षीतस्थळी हलवावे लागले आहे. कितीतरी शेकडो लोकांच्या घराचा अशरक्षः कोळसा झाला आहे. लाखो हेक्टर जमिन जळून खाक झाली आहे.दोन्ही देश मिळून हा मजकूर लिहण्यापर्यत सुमारे 30 ते40 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत.या देशांचे वणवा विझवण्याचे प्रयत्न तोकडे पडत असल्याने इतर देशाकडून वणवा विझवण्याचे प्रयत्न सुरु आहे. तूर्की देशातील सर्वसामान्य जनता घरातील बादली, भांडी पाण्याने भरुन, झूडपे गवत आगीवर मारुन जमेल त्या मार्गाने आग विझवण्याचा प्रयत्न करत आहे.           या आगीमुळे वातावरणात हजारो टन ग्रीन हाउस गँसेस सोडला जात आहे. ज्याचे भविष्यातील दुषपरीणाम खुपच मोठे असणार आहेत.आर्थिक हानी तर मोजण्याचा पलीकडे जाईल का?असी स्थिती आहे. स