पोस्ट्स

नोव्हेंबर २०, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आभाळच फाटलंय !

इमेज
           आपल्या मराठीत एखाद्यावर प्रचंड प्रमाणात संख्येने अनेक संकटे आल्यावर त्याच्यावर आभाळ फाटलंय असे म्हणतात . आभाळ फाटलंय हा वाक्यप्रचार खरा असल्यासारखी स्थिती सध्या भारताच्या दक्षिणेच्या राज्यातील आहे तामिळनाडू पाँडिचेरी आणिआंध्र प्रदेशात प्रचंड प्रमाणात पाऊस पडत आहे . आंध्र प्रदेशाच्या तिरुपती या धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्वाच्या शहरात कधीही नव्हती अशी स्थिती निर्माण झाली आहे अत्यंत मुसळधार पाऊस आणि त्यात भरीस भर म्हणून होणारे लँडसाईड यामुळे तेथील प्रशासन आभाळ फाटलंय ही स्थिती अनुभवत आहे शनिवार २० नोव्हेंबर पर्यंत या पावसामुळे विविध घटनांमध्ये १३ जणांचा मृत्यू झाला आहे तर एक बस वाहून गेल्याने ५०जण बेपत्ता आहेत हवाई दल आणि राज्य आपत्ती मदत दलाच्या (state disaster relief force) तुकड्यांमार्फत मोठ्याप्रमाणात बचाव कार्य सुरु आहे हवाई दल मिग १७ या हेलिकॅप्टर चा मदतीने पुरात अडकलेल्या व्यक्तींची मदत करत आहे आंध्रप्रदेशच्या रायलसीमा या भागातील ३ आणि किनारी प्रदेशातील एका जिल्ह्याला या पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे यामुळे दक्षिण मध्य रेल्वेच्या सेवांवर देखील अत्यंत वाईट परिणाम झाला