पोस्ट्स

सप्टेंबर १, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारतीय रेल्वेची घोडदौड सुरूच

इमेज
 जगात चौथ्या क्रमांकाची मालवाहतूक करणारी, ऑस्ट्रोलिया या देशाच्या एकूण लोकसंख्येएव्हढ्या व्यक्तींची दररोज वाहतूक करणारी भारतीय रेल्वे सध्या वायुवेगाने बदलत आहे . रोज नवनवीन कीर्तिमान रेल्वेकडून केले जात आहेत , हे आपण जाणतातच . मग तो कधी जगातील विश्वविक्रम करणारे पूल बांधणे असो, अथवा मालवाहतूक वेगवान व्हावी यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना असो किंवा प्रवाश्याना अधिक दर्जेदार सेवा पुरवण्यासाठी केलेली उपाययोजना असो . भारतीय रेल्वे कायमच प्रगतीच्या वाटेवर प्रगतीची नवनवीन शिखरे गाठत आहे . माझे आजचे लेखन यातील काही बाबींची दखल घेण्यासाठी .  तर मित्रानो , नुकतेच देशातील मालवाहतुकीची अधिक वेगाने विनाअडथळा वाहतूक व्हावी या हेतूने उभारण्यात येणाऱ्या डेडिक्रेडीटेड फ्रेड कॉरिडार च्या नव्या मार्गासाठी करावयाची कार्ये रेल्वेकडून सुरु करण्यात आली आहेत . त्या अंतर्गत विजयवाडा ते इटारशी(975किमी ), विजयवाडा ते खडकपूर (1115किमी  ) आणि भुसावळ ते कोलकत्ता (1673 किमी )रेल्वेमार्ग बांधण्यात येणार आहेत . हे तिन्ही रेल्वेमार्ग मिळून 4000 किमी असणार आहे ज्यामुळे खनिज संपत्तीने समृद्ध मात्र औद्योगिकदृष्ट्या शा ओ