पोस्ट्स

सप्टेंबर २५, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

घटती प्रशासनातील अधिकाऱ्याची संख्या

इमेज
      24  सप्टेंबरला मागच्या सन 2020 साली झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेचे निकाल जाहीर झाले .सर्वसाधारणपणे जानेवारी ते मार्च च्या दरम्यान होणारा मुलाखतीचा   टप्पा यावेळी कोरोना संसर्गामुळे बराच लांबला मुलाखतीचा टप्पा 22 २सप्टेंबररोजी संपला अन्य वेळी मुलाखतीचा टप्पा संपल्यावर पंधरा दिवस ते महिन्याचा अवधीत जाहीर होणार अंतिम निकाल यावेळी केंद्रीय लोकसेवा आयोगाने अवघ्या दोन दिवसात जाहीर केला   गेल्या काही वर्षांपासून कमीत कमी अधिकारी निवडण्याचा प्रघात केंद्रीय लोकसेवा आयोगाने याही वर्षी सुरूच ठेवला या वर्षी फक्त 762 अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली   मागील 2019 वर्षी 796 अधिकारी निवडण्यासाठी परीक्षा झाली होती.. सन 2015साली .1129,    ,2016 साली   1079, 2017साली 980   , 2018   साली 792 , 2018 साली 896 अधिकारी निवडण्यासाठी परीक्षा झाली होती.   पुर्वी दरवर्षी जितके अधिकारी सेवानिवृत्त होत तितकेच आता होत आहेत, मात्र सातत्याने नविन अधिकाऱ्यांची भरतीसंख्या कमी होतानाच दिसते .गेल्या सहा वर्षीचा आढावा घेतल्यास 2018 पेक्षा 2019 मध्ये अल्पशी वाढ दिसते, हाच तो काय छोटासा दिलासा.