पोस्ट्स

जानेवारी ५, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अमेरिकी इराण संघर्ष (भाग 1)

इमेज
                   सध्या समस्त जगाचा केंद्रबिंदू बनलेल्या इराण या देशाच्या सध्याच्या घडामोडीकडे बघताना आपणास आजपासून 40 वर्षांपूर्वी झालेल्या इराणी क्रांतीकडे दुर्लक्षून चालणार नाही . आपणास सध्याच्या अमेरिका आणि इराण या देशांच्या तणावाची पायांमुळे सन 1979 साली झालेल्या इराणी क्रांतीत सहजतेने सापडतात . तेव्हापासून सुरु असलेल्या अमेरिकाविरोधी कारवाईचा  आता वटवृक्ष झाला आहे . ज्याची फळे आपणस इंधन दरवाढीचा स्वरूपात सहन करावी लागू शकतात . त्यामुळे हा प्रश्न मुळात समजून घेणे अत्यावश्यक आहे . माझे आजचे लेखन त्यासाठीच .              इराण आणि सभोवतालचा प्रदेश नैसर्गिक इंधनाच्या साठ्याने समृद्ध आहे . या साठ्यावर नियंत्रण मिळावे , यासाठी मुख्यतः अमेरिका आणि तिचे मित्र  देश विविध क्लृप्त्या लढवत असतात . देशातील शासक कितीही लोकोपयोगी कामे करत असला तरी त्याला सत्तेतून उठवणे , देशातील शासक लोकांवर कितीही अन्याय करत असला तरी त्यास मदत करणे , ही त्याची या सर्व प्रदेशासाठी नीती आहे . अफगाणिस्तानमधील तालिबान असो अथवा इराक  मधील सद्दाम  हुसेन , इजिप्त मधील गडाफी राजवट असो , ही सर्वच अमेरिकेची निर

विश्व पुस्तक मेळा आणि मराठी पुस्तक विश्व

इमेज
                            आज 5 जानेवारीला  हा लेख लिहीत असताना नवी दिल्लीला प्रगती मैदान येथे पुस्तकप्रेमींचा कुंभमेळा म्हणून ज्यास सहजतेने संबोधता येईल,  असा  विश्व पुस्तक मेळा  मोठ्या दिमाखात सुरु आहे . 4 जानेवारीला सूरु  झालेला हा वाचकांचा कुंभमेळा 12जानेवारी पर्यंत चालू असेल .  मात्र जगातील 17व्या क्रमांकाची मातृभाषा असणाऱ्या मराठीचे या विश्व पुस्तक मेळ्यात स्थान काय आहे ? याचा आढावा घेतला असता समोर येणारे चित्र फारसे उत्साहवर्धक नाही . कोणत्याही मराठी वृत्तवाहिन्यांवर याची एक मिनिटाची देखील बातमी मी बघितली नाही . मराठी साहित्यविश्वात साहित्य संमेलनाचे जे अनन्य साधारण महत्व आहे , तेच किंबहुना त्याहून कणभर अधिक असे महत्व जागतिक आणि भारतीय साहित्याचा विचार करता या विश्व साहित्य मेळाचे आहे . मात्र त्या ठिकाणी मराठीचे तुरळक अस्तिव आहे . मराठीतील साहित्याचा अवीट गोडवा जगासमोर येण्याची एक उत्तम संधी यामुळे मराठी भाषिकांकडून निसटून गेली आहे . भारताचा विचार करता मराठी भाषिक आज तिसऱ्या क्रमांकावर आहेत . जगातील दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असणाऱ्या  देशात जिथे 21 अधिकृत भाषा आहेत