पोस्ट्स

जानेवारी ६, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

९ ते ११ जानेवारी हे दिवस पाकिस्तानसाठी अत्यंत महत्त्वाचे !

इमेज
             ९ ते ११ जानेवारी हे ३ दिवस पाकिस्तानसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत .पाकिस्तानमधील लोकशाही कोणत्या मार्गाने प्रवास करणार ? पाकिस्तानमधील राजकीय संकट अजून गहिरे होते की .  तो तणाव नाहीसा होतो? याबबाबाचा निर्णय या तीन दिवसात होईल ९ जानेवारीला मुळात ३१ डिसेंबरला होणाऱ्या मात्र पाकिस्तानातील केंद्रीय सत्तेत असणाऱ्या पाकिस्तान डेमोक्रेक्तिक मूव्हमेंट १७  पक्षाच्या  आघाडीच्या राजकीय खेळीमुळे लांबणीवर पडलेल्या इस्लामाबाद महानगरपालिकेच्या निवडणुका होतील या निवडणुकीत आधी मतदानपूर्व कल चाचणीत व्यक्त झालेल्या प्रमाणे बॅट ची जादू (इम्रान खान यांच्या पक्षाचे चिन्ह )किती प्रमाणत चालते ? हे बघणे उत्सुकतेचे ठरेल . याच दिवशी पाकिस्तानी पंजाबच्या विधानसभेत तेथील मुख्यमंत्री परवेझ इलाही यांच्या विरोधात अविस्वासाच्या मुद्यावर मतदान होईल . त्याच दिवशी म्हणजे ९ जानेवारीला  लाहोर उच्च न्यायालयात पाकिस्तानी पंजाबची विधानसभा विसर्जित करणे संविधानाला धरून कायदेशीर आहे का ? याबाबत .सुनावणी होईल  त्यानंतर ११ जानेवारीला लाहोर उच्च न्यायालायने पाकिस्तानी पंजाबच्या विधानसभेच्या प्रश्नावर  या  मुदतीपूर्वी प