पोस्ट्स

नोव्हेंबर १, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

राजकारणाने दूर सारले, नैसर्गिक आपत्तीने जवळ केले

इमेज
                           "राजकारणाने दूर सारले, नैसर्गिक आपत्तीने जवळ केले", असे म्हणावे लागेल, असी स्थिती नुकतीच जागतिक राजकारणात निर्माण झाली, आणि त्याला निमित्य ठरले , तो तूर्कस्थानच्या इम्रली या राज्यात आलेला शक्तीशाली भुकंप . या भुकंपामुळे ग्रीस या देशाचे देखील काही प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे ग्रीसचे पंतप्रधान कोस्तास कारामान्लिस यांंनी तूर्कस्थानच्या अध्यक्ष एर्डोगन यांना फोन करुन आपल्या दोन्ही राष्ट्रात राजकीय मतभेद कितीही तीव्र असले तरी या नैसर्गिक संकटाशी आपण एकत्र लढले पाहिजे, असा संदेश दिला . ज्यामुळे जागतिक राजकारणात एक वेगळा संदेश दिला गेला .                           या दोन शत्रू राष्ट्रांना एकत्र येण्यास भाग पडणारा भुकंप (नैसर्गिक) घडला दिनांक 30, आँक्टोबर रोजी जागतिक प्रमाणवेळेनुसार सायंकाळी पाच वाजून वीस  मिनीटांनी.  युरोपिय प्लेट,आफ्रिकन प्लेट, आणि अरेबियन प्लेट या क्षेत्रात एकत्रीत येतात . त्यातील अरेबियन प्लेट ईतर दोन प्लेट पासून दूर जात असल्याने (ती प्लेट भारतीय प्लेटकडे येत आहे)तसेच आफ्रिकन प्लेट आणि युरेशियन प्लेट सातत्याने एकामेकांवर घासत असल्यान

अमेरिका जगातील एक क्रमांकाची घाण

इमेज
     सध्या जगात काय चालू आहे? याचा आढावा घेतल्यास फ्रान्समधील घडामोडी या प्रमुखतेने लक्षात येतात. फ्रान्समधील घडामोडीवर विविध प्रकारची प्रतिक्रिया जगभरातून व्यक्त केल्या जात आहेत. मात्र या सर्व प्रकारात चोर सोडून संन्यासाला फाशी हा प्रकार सुरु आहे, हे सहजतेने लक्षात येते. या सर्व घडामोडीमागे अमेरिकेने 1950 ते 1990 या कालावधीत पश्चिम आशिया आणि उत्तर आफ्रिका खंडात केलेल्या उचापती जवाबदार असल्याचे याकडे तटस्थतेने बघीतल्यास सहजतेने लक्षात येते. अफगाणिस्तान मधील तालिबानी राजवटीची निर्मिती असो, अथवा लोका़ंची काहीही तक्रार नसताना सदाम हुसेन यांची ईराक मधील सत्ता नष्ट करणे, गडाफीला उत्तर आफ्रिकेतील प्रमुख सत्ताधिश म्हणून प्रस्थापित करणे, जगभरात लोकशाहीचा मक्ता घेतल्यासारखे वागणाऱ्या अमेरीकेने सौदी अरेबियाचा राजेशाहीविषयी कठोर भुमिका न घेणे. नैसर्गिक तेलासाठी या देशांना वापरणे मात्र त्याचे मोल म्हणून या देशात सुधारणा करण्यासाठी आपण काही लागतो,याकडे सौइस्कर दुर्लक्ष करणे,ही अमेरीकेची यासाठी लक्षात येणारी काही प्रमुख दुषकृत्ये. मात्र गेल्या काही दिवसांपासून या संदर्भात येणाऱ्या बातम्यांकडे बघीतल्