पोस्ट्स

जून २६, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एमपीएससीतील परीक्षार्थीना अंधारात ठेवून केलेलं बदल

इमेज
      सध्या महराष्ट्रातील राजकीय सत्ता नाट्याकडे महाराष्ट्रातील जनता डोळे लावून बसली असताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने  परीक्षार्थीना अंधारात ठेवून मोठा बदल केला आहे एमपीएससी या नावाने प्रचलित असणाऱ्या या आपल्या राज्यघटनेत  स्वतंत्रपणे उल्लेख  असलेल्या  या आयोगामार्फत राज्य शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी अनेक परीक्षांचे आयोजन करण्यात येते या आयोगामार्फत पोलीस खात्यातर्गत  लागणारे कर्मचारी तसेच  प्रशासनात लागणाऱ्या कर्मचाऱ्याबरोबर अभियांत्रीकी सेवेतील कर्मचारी अधिकाऱ्यांची शासनव्यवस्थेत नेमून करण्यासाठी परीक्षा घेण्यात येत असल्या तरी राज्यशासनाच्या प्रशासनात उप जिल्हाधिकारी पर्यतच्या पदासाठी घेण्यात येणाऱ्या  तसेच पोलीस खात्यातर्गत प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी परीक्षार्थींची अधिक पसंती असते     या सर्वात जास्त पसंती असलेल्या परीक्षांचे तीन टप्पे असतातपूर्व परीक्षा मुख्य परीक्षा आणि मुलखात हेच ते  तीन टप्पे यातील मुख्य परीक्षा या टप्यात खूपच मोठ्या प्रमाणात बदल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून करण्यात आले आहेत आतापर्यंत बहुपर्यायी असणार