पोस्ट्स

ऑगस्ट १७, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पर्यावरणाबाबत आपण जागृत कधी होणार ?

इमेज
               मित्रांनो, आपल्या भारतातील देशपातळीवरील  इंग्रजी भाषेतील वृत्तवाहिन्या सुशांतसिंग राजपुत यांच्या मृत्यूबद्दल पोलिसांबरोबर स्वतःचा स्वतंत्र अस्या तपासात मग्न असताना, आपल्या देशावर भविष्यात  दुरगामी परीणाम करतील अस्या दोन.घटना जगात घडत आहे, माझे आजचे लेखन त्यासाठी                   तर मित्रांनो गेल्या कित्येक दिवसांपासून अमेरीका या देशातील कँलिफोर्निया या राज्यात प्रचंड असा वणवा लागलेला आहे . आजमितीस तो वणवा कँलिफोर्निया या राज्यचा शेजारील नेवाडा या राज्यात देखील पसरला आहे . मित्रांनो कँफिलोर्निया या राज्यातील जंगले उत्तर अमेरीका खंडातील प्रमुख जंगले आहेत, आणि गेल्या काही दिवसांमध्ये जगातील प्रमुख जंगलात वणवे लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे . काही महिन्यांपुर्वी दक्षीण अमेरीकेतील अँमेझाँनच्या जंगलामध्ये वणवा लागलेला होता, तो शांत होतोच न होतो तोच आँस्टोलिया या देशात वणवा लागला . आँस्टोलिया येथील वणव्यामधून मानव उशांत घेत असताना सबैरीया येथे वणवा लागला .तो धुमसत असतानाच आता उत्तर अमेरीका खंडात वणवा  पेटलेला आहे .पृथ्वीच्या 7खंडापैकी 4खंडातील वनसंपदा वणव्यात जळून गेली आहे