पोस्ट्स

मार्च १३, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मुंबई आताची ,आणि त्यावेळची !

इमेज
 मी जिथे चहा पितो, त्या चहाच्या टपरीवर सातत्याने जूनी गाणी वाजत असतात.  दोन तीन दिवसापुर्वीचीच गोष्ट आहे.नेहमीप्रमाणे तिथे मी चहा पिण्यासाठी गेलो असता, एक अत्यंत उत्तम गाणे तिथे वाजत होते. "ए दिल मुस्किल है जिना यहा ,...... ये बाँम्बे हे मेरी जान!"        गुरुदत्त प्राडक्शनची निर्मिती असलेल्या सि. आय. डी. या चित्रपटातील हे गाणे त्या वेळच्या मुंबईतील  स्थिती कसी होती? यावर छान भाष्य करते . हा चित्रपट सन1956 रोजी प्रदर्शित झाला. त्यामुळे आपणास तेथील मुंबईची स्थिती समजते. आताची स्थिती कसी आहे? हे आपण जाणतातच.नायक मुंबई किती वाइट आहे, यावर भाष्य करत असतो, तर नयिका मुंबई शहर किती उत्तम आहे, यावर भाष्य करुन त्यास नामोहरण करते. असी गाण्याची मध्यवर्ती कल्पना आहे. जाँनी वाकर आणि वहीदा रेहमान यांच्यावर चित्रीत झालेल्या या गाण्याचे गीतकार आहे गीता दत्त आणि मोहमद्द रफी . गाण्याचे संगीतकार आहेत ओ पी नय्यर . सुमारे 4 मिनीटाच्या या गाण्यात आपणास मुंबईचे महत्त्व अधोरेखीत होते. गाण्यामध्ये सध्याचा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई बाहेर ट्राम जाताना दिसतात . गाण्यामध्ये सुद्धा ट्रामचा उल्ले

भारताचे अशांत शेजार (भाग 4)

इमेज
पाकिस्तान , आपल्या भारताच्या 3 राज्य आणि दोन केद्रशासित प्रदेशांबरोबर सीमा शेअर करणारे, भारतातील सर्वाधिक चर्चेत असणारे राष्ट्र.कधी दहशतवादी कारवाईमुळे तर कधी राजकारणी लोकांच्या आरोप प्रत्यारोपामुळे पाकिस्तानचे नाव भारतात सातत्याने घेतले जाते.तर या पाकिस्तान बरोबर तीन मोठ्या घडामोडी गेल्या पंधरवाड्यात घडल्या. पहिली म्हणजे भारताने कोरोना लस पाकिस्तानला मोफत दिली, ज्याविषयी या आधीच बरेच काही बोलून झाले आहे. त्यामुळे मी त्या विषयी बोलणार नाही. मी बोलणार आहे.पाकिस्तानच्या दुसऱ्या दोन घडामोडीविषयी .        तर मित्रांनो, पाकिस्तानच्या काश्मीरविषयक दाव्याविषयी कायम पाकिस्तानची पाठराखण करणारा, नाटो या अमेरीकाप्रणीत सैनीकी कराराचा भाग असणाऱ्या , तसेच युरोपीय युनियनचा भाग होवू इच्छिणारा देश, ज्या देशातील बहुसंख्य भाग हा आशिया खंडात असून काही भाग युरोपात आहे, असा मुस्लिम बांधव बहुल देश,ज्या देशाचे सविंधान आतापर्यत धर्मनिरपेक्ष होते, मात्र सध्याचे सरकार ते धर्माधिदिष्ठ करण्याचा प्रयत्न करत आहे असा देश  अर्थात तूर्कस्थान या देशाबरोबर पाकिस्तानचा होणाऱ्या संरक्षणविषरक करारात अमेरीकेने खोडा घातला  आह