पोस्ट्स

डिसेंबर १०, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कधीपर्यत हे चालणार?

इमेज
      महाराष्ट्राचा सांस्कृतिक राजधानी अर्थात पुणे शहरात 9 डिसेंबर 2020 रोजी अत्यंत असंस्कृतपणाचे वर्तन घडले. त्याबद्दल या प्रकरणाचा करावा तितका निषेध कमीच आहे.       पुण्यातील असंस्कृत नागरीकांमुळे एका रानगव्याचा दूर्देवी मृत्यू झाला. कोणत्याही प्रकारची दुर्घटना होवो. मोठ्या प्रमाणावर पुर येवो, अथवा एखादा वन्यजीव चुकून मानवी वस्तीत येवो, अस्या प्रसंगी कसे वागायचे ? याविषयीचा आपल्याकडे असंस्कृतपणा सार्वत्रीक आहे. त्याचेच प्रत्यंतर  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीत अर्थात पुण्यात घडले. या अस्या असंस्कृत लोकांमुळे बचाव कार्यात प्रचंड अडथळे येतात. या अति उत्साही लोकांना आवरायचे की , ज्यांना खरोखरीच मदतीची गरज आहे . त्यांचा मदतीसाठी धावायचे?, असा प्रश्न या अतिउत्साही लोकांमूळे  सातत्याने उपस्थित होतो.               एखादा वन्यजीव मानवी वस्तीत आल्यावर सबंधीत वस्तीतील लोकांमध्ये भिती वाटणे स्वाभाविक आहे. मात्र या लोकांबरोबरच त्याला बघायला इतर लोकही येतात. या गर्दीमुळे आधीच घाबरलेला वन्यजीव  अजूनच घाबरतो, आणि जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे फिरायला लागतो. तो इकडे तिकडे फिरत आहे, हे बघून लोक सु