पोस्ट्स

मे १९, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वंदन एका दृष्ट्या पंतप्रधानला !

इमेज
      1991 मे 21 ही एक साधीसुधी तारीख नाहीये. भारताला एका नव्या उंचीवर घेवून जाण्याची इच्छा असणाऱ्या पंतप्रधान राजीव गांधी यांची निवडणूक प्रचारादरम्यान मानवी बाँम्बस्फोटाद्वारे हत्या झाल्याची ही तारीख होय. आज या तारखेला 20 वर्षे अर्थात एका पिढीचा कालावधी पुर्ण झाला आहे. राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना भावपुर्ण आदरांजली.          राजीव गांधी, स्वतःची इच्छा नसताना, राजकाराणाची आवड असलेल्या धाकट्या भावाचे अपघाती निधन झाल्यामुळे, एक कुटुंबवच्छल,  घराण्याची परंपरा चालवण्यासाठी राजकारणात उतरलेला राजकारणी. ज्यांनी काळाची पाउले ओळखून भारतात तंत्रज्ञानाची मुहुर्तमेढ रोवली. आज आपण ज्या तंत्रज्ञानाचा, आयटीच्या युगात राहातो, त्याची पायाभरणी राजीव गांधी यांनी जनमताचा विरोध पत्कारुन केली.         त्यांचे काही निर्णय प्रचंड वादग्रस्त ठरले. ज्यामध्ये शहाबानो प्रकरणाचा उल्लेख करावाच लागेल. भोपाळच्या मुस्लिम  बांधव परीवारातील शहाबानो या घटोस्फोटीत महिलेला पोटगी देण्याबाबात सर्वोच्च न्यायालय सुरु असलेल्या खटल्याचा निर्णयासंदर्भात घेतलेल्या निर्णयामुळे ते वादग्रस्त ठरले.  स्विडनची शस्त्रात्र