पोस्ट्स

मार्च ३०, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मराठीतील वास्तवदर्शी चित्रपट

इमेज
काही दिवसापुर्वी मी हिंदीतील वास्तवदर्शी चित्रपटाविषयी लिहले होते. त्यावेळेस माझ्या एका वाचकाने हिंदीपेक्षा मराठीत वास्तवदर्शी चित्रपट अधिक असल्याचे माझ्या लक्षात आणून दिले. आणि ते खरेही आहे ना ! मराठीत दहावी फ, सामना, सिंहासन ,सरकारनामा, झेंडा, कायद्याचे बोला, गोष्ट छोटी डोंगराएव्हढी, देवराई, सैराट अस्या एकाहून एक सरस वास्तवदर्शी चित्रपटांनी मराठी चित्रपटश्रुष्टी सजल्याचे आपणास वरवर बघीतले तरी सहजतेने लक्षात येते. स्किझोफेनिया सारखा गंभीर मानसिक आजार, शेतकरी आत्महत्या, राजकारणी आणि बिल्डर यांचे सबंध, सहकारी क्षेत्र , तसेच विधीमंडळातील राजकारण , शैक्षणिक समस्या, जातीय वातावरण, न्यायव्यवस्था  मानवी जीवनातील सर्वच.क्षेत्रांवर मराठीत वास्तवदर्शी  चित्रपट निघाले आहेत. मी वर  उल्लेखलेले चित्रपट हे मुख्य धारेतील चित्रपट आहेत. प्रयोगशील, समांतर धारेतील चित्रपट, तसेच विविध महोत्सवात प्रदर्शीत होणाऱ्या चित्रपटांचा विचार करता , ही संख्या याहून कितीतरी मोठी होइल, हे नक्की. नूकत्याच जाहिर झालेल्या चित्रपट पुरस्काराने यावर सोनेरी मोहरच उमटवली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरायला नको. मी पुण्यात असताना ज