पोस्ट्स

मार्च १५, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

राजकीय अस्थिरतेच्या कडेलोटावर पाकिस्तान

इमेज
     सध्या पाकिस्तानमधून येणाऱ्या बातम्यांवर नजर फिरवल्यास,  तो देश राजकीय अस्थिरतेच्या कडालोटावर आल्याचे स्पष्ट होत आहे. मंगळवार १४ मार्च रोजी इस्लामाबाद उच्च न्यायालयाने माजी पंतप्रधान इम्रान खान यांना १८  मार्चपर्यत पोलीसांच्या संरक्षणात न्यायालयात हजर राहण्याचे आदेश काढले. त्यानंतर इम्रान खान यांच्या लाहोर येथील घराच्या परीसरात समर्थक आणि पोलीसात झालेल्या झडपमुळे याचीच पुष्टी होत आहे.  पंतप्रधानपदी असताना दुसऱ्या देशाकडून देण्यात आलेल्या घडाळ्याच्या भेटीची स्वहितासाठी अत्यंत कमी पैसात विक्री करुन राष्ट्राचे नूकसान केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.माजी पंतप्रधान इम्रान खान  यांना  दुसऱ्या एका प्रकरणात १८मार्चपर्यंत अटकपुर्व जामिन मिळाला असताना, इम्रान खान यांनी सरकार पुरेसी सुरक्षा पुरवत नसल्याने जिवाला धोका आहे ,तरी न्यायालयात आँनलाईन पद्धतीने उपस्थित रहायला परवानगी देण्यात यावी, या न्यायालयास केलेल्या मागणीवर न्यायालयाकडून काहीच कारवाई केली गेली नसताना न्यायालयाकडून आलेल्या या आदेशामुळे पाकिस्तानमधील राजकारण किती तळाला गेले आहे, हेच समजत आहे.पोलीसांकडून इम्रान खान यांच्या लाहोरमधील घ