पोस्ट्स

नोव्हेंबर ६, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दक्षिण आशियाचे राजकारण बदलवणारे वर्ष २०२४

इमेज
नविन वर्ष सुरु होण्यास अजून पावणे दोन महिन्याचा अवधी शिल्लक असला तरी येणारे नवीन वर्ष २०२४ फक्त भारतासाठीच नव्हे तर समस्त दक्षिण आशियासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे.याबतच्या  घटना घडण्यास सुरवात झाल्याने त्यांची  माहिती असणे आवश्यक आहे. तर मित्रांनो आपल्या भारतासह भुटान,बांगलादेश, पाकिस्तान या देशात त्यांच्या संसदेच्या निवडणूका तर श्रीलंकेत त्यांच्या राष्ट्रपतींची निवडणूक या२०२४ मध्ये होणार आहे.या निवडणूकांमध्ये त्या त्या देशांतील समस्त राजकीय जीवन बदलण्याची शक्यता असल्याने संपूर्ण दक्षिण आशियासाठी हे वर्ष २०२४ अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.  त्यातील भुटान या देशातील निवडणूका या भारत आणि दक्षिण आशियावर फारस्या परिणाम करणाऱ्या नसल्याने आणि भारतातील निवडणूकांबाबत अजूनही फारसी वातावरणनिर्मिती न झाल्याने त्या दोन निवडणूका काहीस्या बाजूला ठेवूया .या निवडणूकांपैकी पाकिस्तान आणि बांगलादेशातील निवडणूका भारतासाठी किंबहुना समस्त दक्षिण आशियासाठी महत्त्वाच्या असल्याने त्यावर प्रथम बोलूया          तर इस्लाम हा राष्ट्रीय धर्म असणाऱ्या देशांचा विचार करता दुसऱ्या क्रमांकाची मुस्लिम बांधवाची लोकसंख्या