पोस्ट्स

डिसेंबर १४, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सिंहावलोकन खगोलशास्त्र 2020

इमेज
सन 2020 मधील सर्वात चर्चीत असणारी गोष्ट करोना असली तरी खगोलशास्त्रात अनेक घडामोडी घडल्या . त्याविषयी सांगण्यासाठी हे लेखन .  तर मित्रानो, आपल्या सौरमालेच्या बाहेर पृथ्वीपासून   17 अब्ज प्रकाशवर्ष दूर असणाऱ्या  एका ठिकाणहून दोन कृष्णविवर एकत्र आल्याचे शास्त्रज्ञांना आढळून आले आहे .शास्त्रज्ञांनी या जागेला GW190521 असे नाव दिले आहे  आपण जी घटना आता बघतो आहोत ती घटना 17 अब्जवर्षांपूर्वी घडून गेली आहे . त्या वेळी निर्माण झालेल्या  गुरुत्त्वीय लहरी प्रकाशाच्या वेगाने प्रवास करत आता आपल्या पर्यंत पोहोचल्या आहेत विश्वाचे वय साधारणतः 17ते  20 अब्ज असावे असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे . त्या हिशोबाने विश्व जन्मला आल्यावर लगेच ही घटना घडलेली असावी . विश्वााची निर्मिती नेमकी कोणत्या प्रकारे झाली याची माहिती मिळण्यासाठी याचा उपयोग होवू शकतो. आइस्टाइनच्या सापेक्षवादाच्या सिद्धांताच्या आधारे हा शोध घेण्यात आला. एकीकडे सौरमालेच्या बाहेर दोन कृष्णविवर एकत्र आलेले आढळून आले असताना आपल्या सौरमालीकेतील सुद्धा अनेक महत्तवाचे शोध 2020 या वर्षी लागला .आपल्या सौरमालिकेतील सेरस(याचे विविध नावे प्रचलीत आहेत. मात

झुक झुक अगीन गाडी(भाग 2)

इमेज
              मित्रांनो, आपल्या भारताची रेल्वे विद्युतवेगाने कात टाकत असल्याचे आपणास ज्ञात आहेच. देशभरात सुरु असणाऱ्या या बदला अंतर्गत  महाराष्ट्रात देखील झपाट्याने बदल होत आहेत. यातील  रेल्वेमार्गाचे दुपद्रीकरण, तिहेरीकरण, आणि चौपद्रीकरण याविषयी माहिती पहिल्या भागात घेतली. आपण याचा पहिल्या भागात घेतली. (ज्यांना ती वाचायची असेल त्यांनी या लेखाच्या खाली असणाऱ्या लिंकवर क्लिक करावी) या भागाात मी बोलणार आहे ते महाराष्ट्रातील विद्युतीकरणाविषयी.            आपल्या महाराष्ट्रात 5678किलोमीटरचे रेल्वेमार्ग आहेत. त्यातील सुमारे 60% म्हणजेच 3357 किलोमीटरच्या रेल्वेमार्गाचे विद्यूतीकरण झालेले आहे. सध्या रेल्वे झपाट्याने शुन्य कार्बन निर्मिती होण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याच मालिकेत  भारतातील सर्व रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण करण्याचे कार्य करत आहे. या प्रकल्पा अंतर्गत महाराष्ट्रातील पुढील मार्गाचे विद्यूतीकरण सुरु आहे. हे मार्ग विद्युतीकरणाच्या कार्यांमध्ये विविध टप्यामध्ये आहेत, म्हणजेच काही मार्गाचे विद्यूतीकरण करण्याचे रेल्वेचे नजिकच्या भविष्यकाळात करण्याचे नियोजन आहे. काही मार्गाचे काम जवळपास प