पोस्ट्स

मार्च २८, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

गुजराती प्रदेशातील मराठी बेट बडोदा (वडोदरा )

इमेज
                       मी नुकतीच म्हणजे वार रविवार, 15 मार्च 2020 रोजी गुजरातमधील महत्त्वाचे शहर असणाऱ्या बडोदा ( गुजराती उच्चार वडोदरा )या शहराला भेट दिली . त्यावेळी मला आलेले अनुभव तुम्हाला सांगण्यासाठी आजचे लेखन . माझ्या या प्रवासाची सुरवात झाली, ती नेहमीप्रमाणे आदल्या दिवशी  शनिवारी . शनिवारी सायंकाळी गुजरात राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे सुरत बसने मी नाशिकहून सुरतला प्रस्थान केले आणि माझ्या बडोदा दौऱ्याची सुरवात झाली . दिंडोरी, सापुतारा वाजदा , चिखली मार्गे सुरतला पोहोचल्यावर , माझ्या प्रवासाचा पहिला टप्पा संपला . पंधरा वीस मिनिटे सुरतला घातल्यावर प्रवासाच्या दुसऱ्या टप्याला अर्थात सुरत ते बडोदा प्रवासाला सुरवात केली . मला नाशिकहून विनाथांबा बडोद्याला  जाता आले असते . मात्र मी तसे केले नाही , कारण तसे केले असते तर मला या दौऱ्यादरम्यान जो गुजरात राज्य परिवहन महामंडळाच्या अनुभव घेयचा होता , तो या मुळे घेता आला नसता . तर सुरतेहून रस्तेमार्गे 150किमीवर असणाऱ्या बडोदा (गुजराती उच्चार वडोदरा ) या शहरासाठी गुजरात राज्य परिवहनाच्या एक्सप्रेस दर्जाच्या बसमधून प्रवाश्यास सुरवात केली