पोस्ट्स

फेब्रुवारी ५, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पाकिस्तानच्या आर्थिक अरिष्ट्यात वाढ

इमेज
                 पाकिस्तानच्या आर्थिक अरिष्ट्यात दिवसोंदिवस  वाढच होताना दिसत आहे .  पाकिस्तानचे परकीय चलनमुळात कमी असताना ते मोठ्या झपाट्याने कमी होत आहे परकीय चलन मिळवण्याचे मार्ग सुद्धा दिवसोंदिवस कमी होत चालले आहे  पाकिस्तानच्या डोक्यावरचे परदेशी कर्ज बघून सुद्धा आय एम एफ सुद्धा बेलआऊट पॅकेज देण्यास फारशी इच्छुक नाही जुन्या कर्जाची परतफेड करण्यासाठी नव्याने कर्ज घेण्याची वेळ पाकिस्तानवर आली आहे  अनेक मिनतवाऱ्या करून सुद्धा परदेशी गुंतवणूकदार पाकिस्तानात गुंतवणूक करायला तयार नाहीत या आधी ज्यांनी गुंतवणूक करू असे,  सांगितले होते ते देश सुद्धा आत हात आखडता घेत आहे या हात आखडता घेण्यात नुकताच पाकिस्तानचा मित्र देश सौदी अरेबिया देखील सहभागी झाला आहे आजपासून सुमरे तीन वर्षांपूर्वी सौदी अरेबियाने पाकिस्तानात तब्बल २० अब्ज अमेरिकी डॉलर गुंतवूणक करण्याचे ठरवले होते.  ही गुंतवणूक सौदी अरेबिया पाकिस्तानातील विविध विकास कामामध्ये करणार होता  त्यातील बलुचिस्तानमधील तेल विहिरींबाबत सौदी अरेबियाने या आधीच नकार घंटा वाजवली होती आता उरलेल्या गुंतवूणकीतुनही सौदी अरेबियाने . हात आखडता घेतला आहे     

वाहतूक सुरक्षा रामभरोसे ,हे दुर्देवच

इमेज
         देशातील वाहतूक सुरक्षा राम भरोसेच आहे, हे शुक्रवार 5फेब्रुवारी रोजी नाशिककरांनी अनुभवले. नाशिक औरंगाबाद रस्त्यावरील कैलासनगर चौफुली येथे एक मालट्रक आणि वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थांची वाहतूक करणाऱ्या बसचा मोठा अपघात झाला.यावेळी बस पलटी झाली आणि  रक्ताचा थारोळ्याने सर्व परीसर लालेलाल झाला.बसमधील काही विद्यार्थी रुग्णालयात जीवन मरणाची झुंज देत आहेत. काही दिवसापुर्वीच भाजपाच्या एका आमदाराच्या मुलाचा त्याचा सहा मित्रांसह अपघाती मृत्यू झाल्याचे आपणास माहिती असेलच. या घटना देशातील वाहतूक व्यवस्था राम भरोसेच असल्याचे स्षष्ट करत आहे.                चांगले झालेले रस्ते हे वाहतूक सुरळीत होण्यासाठी आहे, हे रस्ते अतिवेगात चालवण्यासाठी नाहीत, याचा विसर पडल्याने प्रचंड वेगात वाहने चालवण्याची स्पर्धाच सध्या भारतात सुरु आहे. त्यामुळे या प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. वेगात वाहने चालवण्याबरोबर दुभाजकामुळे समोरच्या रस्त्यावर जाण्यास, लांबच्या मार्ग अवलंबावा लागत असल्यास, ऐकरी मार्ग सोडून विरुद्ध दिशेने वाहन चालवण्याची प्रवृत्ती, तसेच मागच्या वाहनास पुरेसी कल्पना न देता वाहन थ