पोस्ट्स

एप्रिल १८, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बातमीतील पाकिस्तान भाग 3

इमेज
सध्या आपल्या भारतात जरी कोरोनाचा उद्रेक हा विषय सर्व माध्यमांमध्ये दिसत असला तरी चँनेल न्युज एशिया, बिबिसी, आणि यासारख्या अन्य माध्यमांमध्ये कोणत्या विषयावर वार्तांकन केले जात आहे. याचा मागोवा घेतल्यास आपणास उत्तर मिळते पाकिस्तान . गेल्या तीन ते चार दिवसात घडलेल्या आंतरराष्ट्रीय घडामोडीकडे बघीतल्यास 3गोष्टींमुळे पाकिस्तान चर्चेत आला आहे. पहिली गोष्ट म्हणजे युनाटेड अरब अमिरात या देशाच्या अमेरिका देशातील राजदूताने भारत पाकिस्तान विषयी केलेले विधान, दुसरी गोष्ट म्हणजे अमेरीकेने रशियाला अमेरिकेच्या अंतर्गत बाबीमध्ये ढवळाढवळ केल्याचा आरोपावरुन एक कंपनी,आणि सहा नागरीकांवर लादलेले निर्बंध आणि तिसरी गोष्ट म्हणजे फ्रान्स विरूद्ध होणारे दंगे. आता बघूया एक एक गोष्ट सविस्तरपणे. तर अनेक आंतरराष्ट्रीय बातम्यांमध्ये ज्याची शक्यता वर्तवण्यात येत होती, त्या बाबीवर अर्थात भारत पाकिस्तान या दोन देशांमध्ये सामंजस्य निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा गोष्टीला युनाटेड अरब अमीरात या देशाच्या अमेरिकेतील राजदूताने पुष्टी दिली आहे. युनाटेड अरब अमिरात जगभरात स्वतःची प्रतिमा साँफ्ट पाँवर करण्यासाठी गेल्या काह