पोस्ट्स

नोव्हेंबर ४, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

६ नोव्हेंबरपासून इजिप्त मध्ये होणारे कॉप अधिवेशन मुळात काय आहे ?

इमेज
येत्या ६ नोव्हंबरपासून इजिप्तमधील शर्म अल-शेख, या शहरात हवामानबदलाविषयीची अत्यंत महत्त्वाच्या अश्या कॉप  परिषदेच्या २७ व्या  अधिवेशनाला सुरवात होईल .जे १८ नोव्हेंबर पर्यंत चालेल . हवामान बदलाविषयी जगात जे कार्यक्रम चालतात त्यामध्ये कॉप अधिवेशन अत्यंत महत्त्वाचे जवळपास पहिल्या क्रमांकाचे महत्त्वाचे आहेत .संयुक्त राष्टसंघाने मागील वर्षी अर्थात २०२१ मध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार  येत्या भविष्यात हवामान बदलामुळे जगात सर्वात प्रभावित होणार देश आपला भारत आहे त्यामुळे या हवामान बदलाविषयी घडणाऱ्या या जागतिक परिषेदेची माहिती असणे आपल्या भारतीयांसाठी अत्यंत महत्वाचे आहे  तर जगाला हवामानबदल हे जागतिक संकट असल्याची जाणीव होऊन या बाबत काहीतरी करायला हवे ही जाणीव सर्वप्रथम १९७२ साली झाली त्यावर्षी स्टॉकहोम या शहरात पहिली अर्थ समिट झाली . त्यानंतर पुढील २० वर्ष हवामानबदलाविषयी फारश्या घडामोडी घडल्या नाहीत पुढे १९९२ साली जगाला मानवी हस्तक्षेपामुळे पृथीच्या हवामानाची हानी होत असून ती सुधारणे हे मानवाचे कर्तव्य असल्याचे प्रकर्षाने जाणवले आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या पुढाकाराने रिओ दि जानोरो या शहरा