पोस्ट्स

फेब्रुवारी २२, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

माझे वाचन (भाग २ )

इमेज
        आपल्या पाल्याने वाचन करावे यामध्ये पालकांची काय भूमिका असते ?  हे आपण मागच्या भागात बघितले   या भागात आपण एखाद्याला ठराविक विषयावरची पुस्तके वाचायला कसे काय आवडू शकते ? यावर बोलूया . एखाद्यास ठराविक विषयाची पुस्तके आवडण्यात  त्याच्या सभोवातालच्या व्यक्ती कोणत्या प्रकारचे पुस्तक वाचतात तसेच पुस्तक वाचनास सुरवात करताना त्यास कोणत्या प्रकराची पुस्तके वाचायला मिळाली ? याचा मोठा प्रभाव असतो या खेरीज व्यक्तीच्या शैक्षणिक आणि व्यावसाईक गरजेचा देखील मोठा प्रभाव असतो ? जर एखाद्यास आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावर विशिष्ट विषयाची पुस्तके वाचणे क्रमप्राप्त झाले तर आयुष्याच्या पुढील टप्यावर त्या विषयाची पुस्तके वाचायची गरज नसली तरी एखादा व्यक्ती त्याच विषयाची पुस्तके वाचू शकतो   माझ्याबाबत बोलायचे झाल्यास मी शाळेत असताना माझ्या शाळेच्या ग्रंथपाल असणाऱ्या मॅडम आम्हाला सातत्याने सांगत असत , अरे तुम्ही विविध विषयाची माहिती देणारी पुस्तके वाचायला हवी विविध साहित्यकृती वाचायचे हे तुमचे वय नाही .तुम्ही साहित्यकृती नंतरच्या आयुष्यात वाचू शकता सध्या तुम्ही विविध प्रकारची माहिती देणारी पुस्तके वाचून

माझे वाचन .... (भाग १ )

इमेज
                        कालचीच गोष्ट आहे , मला एका मित्राने  फोन  करून त्याच्या मुलाची व्यथा ऐकवली . त्यांची व्यथा अशी होती की, कितीही सांगितले.. विविध उपाय केले तरी त्याचा मुलगा काही केल्या वाचतच नव्हता . आपल्या मुलाने चांगले वाचनवीर व्हावे अशी इच्छा माझ्या मित्राची इच्छा होती मात्र त्याचा मुलगा काही केल्या ती पूर्ण करत नव्हता अखेरचा उपाय म्हणून तो माझ्याकडे आला होता तसा बघायला गेलो तर माझ्या मित्राने उपस्थित केलेला हा फक्त त्याचा एकटाच प्रश्न नाहीये .आजकाल अनेकांना या प्रश्नाने ग्रासलंय त्या अर्थी हा प्रश्न सामाजिक झाला आहे त्यामुळे हा प्रश्न अक्राळविक्राळ स्वरूप धारण करण्याच्या अगोदर त्याचे निराकारण करण्याच्या प्रयत्न केल्यास उत्तम या वचनानुसार हा प्रश्न सोडवण्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न म्हणजे सदर लेखन आहे     तर मित्रानो मुलांच्या वाचनाची सुरवात होते ती पालकांपासून . पालक जर वाचणारे असतील तर मुले सुद्धा वाचायला लागतात हा सर्व साधारण इतिहास आहे  बाल  मानसशास्त्रज्ञांच्या विचार करता  , ते नेहमी, मुले नेहमी मोठ्याच्या सांगण्यातून नव्हे तर कृतीतून शिकतात . मोठी जी कृती करतात तशीच कृत