पोस्ट्स

मार्च ६, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दाटुन आले मळभ !

इमेज
      महाराष्ट्र भारताच्या 27 राज्यांपैकी क्षेत्रफळाने 3ऱ्या क्रमांकाचे मोठे राज्य . देशाला अनेक बाबतीत दिशाग्दर्शन करणारे, समाजसुधारणेचा मोठा वारसा असणारे राज्य म्हणजे महाराष्ट्र. या महाराष्ट्राचा आर्थिक वर्ष 2020-21चा आर्थिक पाहणी अहवाल शुक्रवार 5 मार्च रोजी महाराष्ट्राच्या विधीमंडळासमोर मांडण्यात आला. आपल्या संसदीय प्रणालीनूसार अर्थसंकल्पाचा आदल्या दिवशी तो मांडण्यात येतो. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 8 मार्च रोजी मांडण्यात येणार आहे. मात्र शनिवार आणि रविवार या दिवशी विधीमंडळाला विश्रांती असल्याने तो शुक्रवारी सादर करण्यात आला .     महिला आणि बालकांवरील अत्याचारात घट,  शेती क्षेत्रातील उत्पादनाच्या वाढीचा दर 11.7 % या जमेच्या बाजू वगळता, सेवा क्षेत्र, उद्योग क्षेत्र , बांधकाम, निर्मिती,उपहारगृह,दळणवळण व्यापर या क्षेत्रातील मागच्या आर्थिक वर्षातील निराशात्मक कामगिरी या आर्थिक पाहणी अहवालात मांडण्यात आली आहे. वीजेचा वापराचा विचार करायचा झाल्यास कृषी पंपासाठी वीजेची मागणी वाढल्याचे तर औद्योगिक आणि व्यापार क्षेत्रातील वीजेची मागणी कमी झाल्याचे या आर्थिक पाहणी अहवालात नमुद केले आहे. महाराष्ट