पोस्ट्स

नोव्हेंबर ७, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

महाराष्ट्राची एसटी गाळात ?

इमेज
           सध्या आपल्या भारतातील मुख्य धारेतील माध्यमे बिहार निवडणूक, अर्णब गोस्वामी यांची अटक आदी मुद्याभोंवती घुटमळत असताना, आपल्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील जीवनवाहिनी असणाऱ्या एसटीबाबत काहीसे मन विषष्ण दोन बातम्या येवून धडकल्या.करोना संसर्गाच्या भीतीने सक्तीने लादण्यात आलेल्या लाँकडाउनमुळे आधीच तोट्यात असणाऱ्या आपल्या एसटीच्या तोट्यात भरच पडली, परीणामी कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी एसटीचे काही आगार आणि ईतर मालमत्ता  तारण ठेवण्याची नामुष्की महामंडळावर ओढवली, हे कमी म्हणून काय एसटीच्या कर्मचाऱ्यांना त्यांचे थकीत पगार देण्यात यावे यासाठी नाशिकच्या कामगार आयुक्तांना निर्देश द्यावे लागले. या त्या दोन बातम्या होत्या सन1948 साली स्थापन झाल्यावर 72वर्षात ईतकी दैनावस्था महामंडळावर या आधी कधीच आली नव्हती. करोना काळात थांबलेल्या प्रवासी भाड्यातून मिळणाऱ्या उत्पनाला पर्याय म्हणून एसटीमार्फत मालवाहतूकचा पर्याय देखील अमंलात आणण्याचा प्रयत्न करुन बघण्यात आला, मात्र मालवाहतूकदारांच्या संघटनेमार्फत याला विरोध झाल्याने एसटी प्रशासनाला हा प्रयत्न थांबवावा लागला.                 एसटीला राज्य सर