पोस्ट्स

नोव्हेंबर २४, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

माळराने", या दुर्लक्षीत पर्यावरण घटकाला समर्पित दिवाळी अंक "भवताल"

इमेज
          आपल्या महाराष्ट्राला मोठा सांस्कृतिक परंपरांचा वारसा लाभलेला आहे . या परंपरा खुपचं विलोभनीय देखील आहेत . काही परंपरा तर फक्त आपल्या महाराष्ट्रातच नाही आढळतात . दिवाळीला खाद्य फराळाबरोबर बौद्धिकफराळ देणारे खास दिवाळी निमित्त देणारे दिवाळी अंक हे फक्त महाराष्ट्रातच आढळणाऱ्या   परंपरेचे एक उत्तम उदाहरण म्हणता येईल . सुरवातीला फक्त कथा कविता असे साहित्य असणारे दिवाळी अंक आता या   कथा कवितांखेरीज अनेक माहितीपुर्ण लेखांनी भरलेली असतात . ही माहिती विविध क्षेत्रांची असते . एका विशिष्ट क्षेत्रांची सखोलपणे माहिती देणारे दिवाळी अंक देखील अनेक आहेत . एका विशिष्ट विषयाला धरून प्रकाशित होणाऱ्या दिवाळी अंकात " भवताल "  हा आपल्या लेखांमुळे महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे . त्यांचा 2023 चा अंक मी नुकताच वाचला .       गेल्या १०वर्षापासून पर्यावरणाशी सबंधित एक संकल्पना घेवून प्रकाशित होणाऱ्या या दिवाळी अंकाची या वर्षाची संकल्पना आहे , माळराने . पर्यावरणाच्या दृष्टीने दुर्लक्षीत अस्या