पोस्ट्स

अभिनेता गुरुदत्त . लेबलसह पोस्ट दाखवत आहे

शोध एक प्रगल्भ आणि विक्षिप्त व्यक्तिमत्त्वाचा 'प्यासा'

इमेज
काही व्यक्तिमत्त्वे मोठी विलक्षण असतात. त्यांच्या विषयी कितीतरी वेळा, कितीतरी वेळ बोलत राहिलो. लिहीत राहिलो तरी दरवेळी त्यांच्याविषयी काय लिहायचे ,काय बोलायचे याचा विचार केला तर दरवेळी कोणतातरी वेगळा मुद्दा , व्यक्तिमत्त्वातील आतापर्यंत फारशा चर्चित ना गेलेला पैलू आपणस गवसतो . आणि आपल्याला या  व्यक्तिमत्त्वाची पूर्ण माहिती झाली आहे.असे वाटत असताना आपणाला या व्यक्तीची पुरेशी माहिती नाही याची जाणीव होते. आज ३० नोव्हेंबर २०२५ रोजी  रात्री साडेदहाच्या सुमारास हा मजकूर लिहीत असताताना  ज्यांचे निधन होऊनच ६० वर्ष झाली आहेत, तरी   ज्यांचा उल्लेख केल्याशिवाय बॉलिवूवंडचा इतिहासच लिहिता येणार नाही.  किंबहुना त्यांना  वगळून इतर सर्व व्यक्तींची माहिती लिहिली तरी त्या इतिहासाची किंमत सकाळी शौचास बसण्यासाठीचा कागद अशीच करावी लागेल असे बॉलिवूवडमधील सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक, सिने निर्माते, सिने अभिनेते, सिने दिग्दर्शक असा सर्वच क्षेत्रात आपली छाप सोडणाऱ्या वसंतकुमार शिवशंकर पदुकोण उपाख्य गुरुदत्त यांचा समावेश  अश्याच काही विलक्षण व्यक्तिमत्वांमध्ये करावा लागेल....

एका दुर्देवी प्रेम त्रिकोणाचा समग्र वेध घेणारे पुस्तक ' व्यस्त ओढीचा त्रिकोण'

इमेज
            आपल्या बॉलिवूडमध्ये अनेक प्रेम कहाण्या प्रसिद्ध आहेत. यातील काही कहाण्या या आनंदायी आहेत . तर काही प्रेम कहाण्यांना मात्र दुर्दैवाची कारुण्याची छाया आहे . या दुःखाची पार्श्वभूमी असलेल्या प्रेम कहाण्यांमध्ये अग्रक्रमामाने नाव येते ते , गुरुदत्त  गीता दत्त आणि वहिदा रेहमान. या जोडीचे . एकीवर नितांत प्रेम असून देखील व्यावसायिक कारणास्तव  जवळ आलेल्या  एका दुसऱ्या व्यक्तिमत्वामुळे अक्षरशः कोंडीत सापडलेल्या गुरुदत्त यांचा या दुर्दवी मृत्यू  या प्रेम कहाणीत झाला . त्यांच्या मृत्यूमुळे आपण एका प्रतिभावंत, कामाप्रती अत्यंत निष्ठावान असेलेल्या, प्रयोगशील,  मात्र मनस्वी हळव्या अश्या अत्यंत हुशार असलेल्या एका ससिने अभिनेत्यासह सिने दिग्दर्शक सिने निर्मेत्यास सिने दिग्दर्शकास आपण तयां अकाली गमावलं . आपल्या बॉलीववूडची खूप मोठ्या प्रमाणात हानी यामुळे झाली त्यांचे एक्ली निधन झाले नसते तर आपण आतापर्यंत आपल्यापासून दूर असलेली ऑस्करची बाहुली अनेकदा पटकावली असती याबाबत कोणाशी शंका नसावी .  गुरुदत्त यांच्या या अकाली जाण्याविषयी अनेकदा अ...

गायकी क्षेत्रातील टँजिडी क्वीन गिता दत्त

इमेज
        जूलै महिन्याची 20 तारीख उजाडली की सिने चाहत्यांना  आठवण होते ती , गिता दत्त यांची .अविट गाण्याची प्रतिभा लाभलेली असून देखील , प्रतिभावन तसेच अत्यंत हळव्या मनाचा आपल्या पतीचा आग्रहास्तव त्याने निर्माण केलेले , दिग्दशीत केलेले अथवा त्याने अभिनेता म्हणून काम केलेले चित्रपट वगळता अन्यत्र फारसी  न गायलेली गायिका गिता दत्त .पतीच्या विवाह्यबाह्य  प्रेमप्रकरणाला कडाडुन विरोध करणारी गायिका म्हणजे गिता दत्त .एका प्रसिद्ध सिने अभ्यासकाचा मते  गीता दत्ता या गायीका क्षेत्रातील मिनाकुमारी आहे ज्याप्रमाने अंगी प्रचंड गुणवत्ता असूनही दुर्देवाच्या फेऱ्यात अडकल्याने मिनाकुमारी अभियानाच्या क्षेत्रात जास्त पुढे जाउ शकल्या नाहीत तोच प्रकार काहीसा गीता घोष चौधरी यांच्या बाबत घडला.             गीता दत्त यांच जन्म सध्याचा बांगलादेशातील फत्तेपुर या गावी एका जमिनदार कूटूबात झाला. 1942 च्या सूमारास त्यांच्या कुटुबियांनी मुंबईत स्थलांतर केले .त्यांच्या  सिनेकारकर्दीची सूरवात 1946 च्या आसपास होते. फारसे गायकीचे शिक्षण न घेता अंगभू...

बाँलिवूडचा खरा सम्राट गुरुदत्त

इमेज
          आपल्या बाँलीवूडमध्ये तयार होणाऱ्या चित्रपटांमध्ये सुखी सुखी गुलाबी चित्रे रंगवणारी अनेक चित्रपटे आढळतात . आपल्या आयुष्यातील वास्तविकतेपासून चित्रपटातील दृश्ये खुप दुर असतात .  मानवी आयुष्यातील दुःखे आपल्या चित्रपटातून मांडणारे फारच कमी मोजके , सिने निर्माते , सिने दिग्दर्शक आपल्या बाँलीवूडमध्ये आढळतात . या हाताच्या बोटांवर मोजता येतील अस्या सिने निर्माते , दिग्दर्शकांमध्ये वसंतकुमार शिवशंकर पदूकोण अर्थात गुरूदत्त यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावेच लागेल . आपल्या बाँलीवूडमध्ये पुर्वी कार्यरत किंवा आता कार्यरत असणाऱ्या सिने दिग्दर्शक , सिने निर्मात्यांपैकी काही मोजकेच सिने निर्माते सिने दिग्दर्शक असे आहेत की ,  ज्यांचे सर्वच्या सर्व चित्रपट कितीही वेळा बघीतले तरी कंटाळवाणे न होता , काहीतरी नविन बघत आहोत असे वाटते . दरवेळी चित्रपटातील कोणता तरी नवा पैलू आपणास गवसतो . अश्या मोजक्या सिने दिग्दर्शक सिने निर्मातांपैकी एक असणारे व्यक्तीमत्व म्हणजे वसंतकुमा...