पोस्ट्स

सप्टेंबर २८, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पर्यावरणप्रेमींचा हाती जर्मनीचे सुकाणू

इमेज
             गेल्या रविवारी 26 सप्टेंबर रोजी जर्मनीच्या केंद्रीय विधीमंडळाच्या (सोप्या भाषेत लोकसभेच्या) निवडणूका झाला. त्या निवडणूकीमध्ये सत्तारुढ खिश्चन डेमोक्रेटिक युनियन (  CDU), आणि खिश्चन सोशालिस्ट युनियन ( CSU ) या पक्षांचा युतीचा  पराभव झाला. मागील 2017 साली झालेल्या निवडणूकीत मिळालेल्या मतांपेक्षा  त्यांना यावेळी 8.7टक्के मते कमी मिळाली. ते 24.1टक्के मिळवून दुसऱ्या क्रमांकावर आहेत.. पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या सोशल डेमोक्रेटीक युनियन (SDP) या पक्षाला 25.6 टक्के मते मिळाली आहेत.   तर पर्यावरण रक्षणाचा मुद्दा घेवून निवडणूकीच्या रिंगणात उतरलेल्या ग्रीन पार्टीस आतापर्यतचे सर्वाधिक मताधिक्य मिळाले आहे. त्यांना 14.8टक्के मते मिळाली आहे. सत्तारुढ  पक्षांनी आपली हार स्विकारली आहे. तेथील कोणत्याच पक्षाला पुरेसे मत्ताधिक्य नसल्याने, सोशल डेमोक्रेटीक पक्षाच्या नेर्तृत्वाखाली आघाडी सरकार स्थापन करण्यात येत आहे.ज्यामध्ये ग्रीन पार्टी मोठी भुमिका बजावणार असल्याचे डि डब्ल्यु , या जर्मन सरकारच्या मालकीच्या वृत्तवाहिनीसह फ्रांस सरकारची मालकी असणाऱ्या फ्रांस 24आणि ब्रिटिश सरकारची मालकी असणाऱ्य