पोस्ट्स

नोव्हेंबर २३, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

साहित्य संमेलन!

इमेज
    डिसेंबर महिन्याचा पहिल्या आठवड्यात नाशिकला ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरु होणार आहे त्यासाठी नाशिकला जोरदार तयारी सुरु आहे . नुकतेच हे संमेलन ज्या ठिकाणी होणार आहे ,त्या ठिकाणी भूमिपूजनाचा कार्यक्रम देखील झाला . त्यावेळी या ठिकाणी कोण कोण विशेष मान्यवर उपस्थित रहाणार आहेत ?याची कार्यक्रम पत्रिका  देखील प्रसिद्ध करण्यात आली आणि काहिस्या शांत झालेल्या वादाला पुन्हा एकदा तोंड फुटले .राजकीय विचारसरणीबाबत   काहीसे वादग्रस्त  मत प्रदर्शन करणाऱ्या एक व्यक्तीला आमंत्रण देण्यावरून एका जातीच्या संघटनेने प्रचंड विरोध केला आहे . त्यांचे मराठी साहित्यातील योगदान काय ? सदर व्यक्ती परभाषिक असून त्यांच्या कार्यक्रमांच्या वेळी सदर व्यक्ती कोणत्याच मराठी साहित्यिकाला बोलवत नाही तरी आपण का बोलवायचे ? असा युक्तिवाद त्यांना विरोध करण्यासाठी केला जात आहे .  माझ्या मते जे पूर्णतः अयोग्य आहे . साहित्यिकाला आमंत्रित करण्यासाठी भाषेचे बंधन असायला नको . कोणत्याही भाषेचा असला तरी साहित्यिकाला साहित्य संमेलनाचे दरवाजे बंद असायला नको . सध्या ते आपणस त्यांच्या साहित्यविषयक कार्यक्रमास बोलवत नसले तर

बुद्धीबळाचे मानसशास्त्र (भाग3)

इमेज
      आतापर्यत एखाद्या बुद्धीबळपटुला यशस्वी होण्यासाठी आणि प्रशिक्षकाला यशस्वी खेळाडू घडवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मुलभुत गुणांची प्राथमिक माहिती करुन घेतली. या  भागात आपण बुद्धीबळपटूस जिद्द चिकाटी आणि  स्मरणशक्ती हे गुण का आवश्यक आहे ,हे बघूया .                चिकाटी अथवा जिद्द हा गुण अनन्यसाधरण आहे. कोणत्याही खेळाडूस जिंकण्यासाठी या गुणांची आवश्यकता असते.पी  सि ए चँम्पियनशीपमध्ये  काँस्पराव विरुद्ध आनंद हे समोरासमोर विश्वविजेतेपदासाठी  एकमेकांच्या समोरसमोर उभे ठाकले असताना, शेवटच्याः डावात जो जिंकेल तो विश्वविजेता बनणार असी स्थिती उत्पन झाली. त्यावेळेस त्या सामन्यादरम्यान काँस्पाराव खेळी केल्यावर भिंतीवर बुक्के आणि दरवाज्याला लाथा मारत असे, शेवटी तो जिंकला. विश्वविजेते झाल्यावर आयोजीत पत्रकार परीषदेत पत्रकारांनी त्याचा आंतीम सामन्यातील वर्तणूकीविषयी विचारणा केल्यावर त्याने सांगितले,"मी माझ्यातील विजूगुषीवृत्ती दरवाज्यावर लाथा आणि भिंतीवर बुक्के मारुन जिवंत ठेवत होतो, विजूगुषीवृत्ती जिवंत ठेवल्यामुळे मी जिंकलो.      चिकाटी हा गुण खेळाडुत असणे अत्यंत महत्तवाचे आहे. या गुणांबरोबरच