पोस्ट्स

नोव्हेंबर ७, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पाकिस्तान पुन्हा एकदा अस्थिरतेचा गर्तेत

इमेज
          पाकिस्तान अस्थिरतेचा गर्तेत सापडल्याचे तेथून येणाऱ्या बातम्यांनी स्पष्ट होत आहे .  3 नोव्हेंबर रोजी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तानचा प्रमुख विरोधी पक्ष "पाकिस्तान तेहरीके इन्साफ " चे संस्थापक अध्यक्ष इम्रान खान यांच्यावर त्यांनी सुरु केलेल्या हकीकी आझादी या महामोर्च्यादरम्यान वझीराबाद या शहारत प्राणघातक हल्ला झाला . या हल्ल्यासासाठी इम्रान खान यांनी पाकिस्तानचे विद्यमान पंतप्रधान शाबाझ शरीफ , गृहमंत्री राणा सलाउल्ला ,आणि पाकिस्तानची गुपचर संस्था आय एस आय चे प्रमुख जवाबदार आहेत अशा आरोप केला .या हल्ल्याच्या तपास पोलिसांनी करावा या हेतूने इम्रान खान यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता पोलिसांती एफ आर आय मध्ये पाकिस्तानी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांची नवे समाविष्ट करण्यासाठी हरकत घेतली त्यामुळे हल्ला होऊन  ७२ तास उलटले तरी पोलिसांनी तकार दाखल करून घेतलेली नाही या दरम्यान हल्ल्यातून सावरत ८ नोव्हेंबरपासून त्यांचा महामोर्चा हल्ला झाला त्या ठिकाणावरून पुन्हा सुरु करत पुढील १० ते १२ दिवसात पाकिस्तानी लष्कराचे मुख्यालय असलेल्या रावळपिंडी सर्वसामान्य