पोस्ट्स

सप्टेंबर २६, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

गुलाब चक्रीवादळाच्या निमित्याने ...... थोडेसे

इमेज
             मित्रानो , हा लेख तुम्ही जेव्हा वाचत असाल तेव्हा गुलाब नावाचे चक्रीवादळ ओडिसा  राज्याचा दक्षिणेच्या आणि आंध्र प्रदेशाच्या सीमांध या भागातील उत्तरेच्या काही जिल्ह्यामध्ये जमिनीला येऊन धडकले असेल  विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची धुवाधार बंटिंग सुरु असेल . आणि टीव्हीवरील बातम्यांमध्ये तेथील विस्कळीत जनजीवन,  प्रशासनाचे लोकांना सुरक्षित स्थळी नेण्याचे प्रयत्न या विषयीच्या बातम्या चालू असतील . गेल्या काही वर्षात मागच्या अनुभवांवरून शहाणे होत प्रशासनामार्फत अत्यंत उत्तम नियोजन केले जाते. त्या बद्दल प्रशासनाचे कौतुक करायलाच हवे . माझे आजचे लेखन मुळात चक्रीवादळे निर्माण कशी होतात ?  कुठे कुठे निर्माण होताता ? या घडामोडींची माहिती देण्यासाठी          तर मित्रानो आपण ज्यास चक्रीवादळे म्हणतो ती मुळात समशीतोष्ण कटिबंधातील वादळे आहेयास पृथीच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावाने ओळखक्ले जाते अमेरिकेच्या पूर्व भागात (अटलांटिक किनारा ) यास हरिकेन तर अमेरिकेचा पश्चिम किनारा आणि जपान फिलिपाइन्स या भागात यास टायफून म्हणतात तर आपण त्यास चक्रीवादळे असे म्हणतो , किंवा नुसतेच वादळ म्हणतो .