पोस्ट्स

एप्रिल २८, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पाकिस्तानात नक्की चाललंय तरी काय?

इमेज
       पाकिस्तानची आर्थिक राजधानी कराची शहरातील विद्यापीठ परीसरात बलूचीस्तान लिबरेशन आर्मीच्या महिला दहशतवाद्याने नुकताच हल्ला केला.ज्यामध्ये चार चीनी नागरीक ठार झाले. चीनी नागरीकांना लक्ष्य करुन दहशतवादी हल्ल्याचे प्रमाण चीनमध्ये प्रचंड प्रमाणात वाढले आहेत.त्याच हल्ल्याचा मालिकेतील हा हल्ला होता. या हल्ल्याचा आधी आपण मातृभूमीसाठी अत्यंत महत्त्वाचे कार्य करत असल्याचा व्हिडीओ सदर महिलाने सोशल मिडीयात पोस्ट केला होता.      बलूचीस्तान मधील सर्वसामान्य जनतेला विश्वासात न घेता, चीनी सरकारच्या मदतीने पाकिस्तानी सरकार बलूचीस्तानातील नैसर्गिक इंधनांचे उत्खन करुन पंजाबचा विकास साधला जात आहे ,आणि बलूचीस्तानचे शोषण केले जात आहे,असा आरोप बलूचीस्तानमधील लोकांकडून सातत्याने करण्यात येतो.या शोषणातील चीनचा सहभाग बघून बलूचीस्तानमची राजधानी क्येटा या शहरात पकिस्तानमधील चीन राजदुतावर प्राणघातक हल्ला झाला होता.काळ आला होता ,पण वेळ आली नसल्याने ते यातून थोडक्यात बचावले होते. एका अंदाजानुसार येत्या आगामी  चार वर्षात 50 लाख चीनी नागरीक पाकिस्तानत येण्याची शक्यता आहे. त्यातच बलूचीस्तानमधील स्वातंत्र्यप्रेमी न