पोस्ट्स

डिसेंबर ३१, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पूर्वांचल वेगाने रेल्वे विकासाच्या वाटेवर !

इमेज
        आपल्या भारताचा विचार करता ईशान्य भारत हा दळणवळणाच्या बाबतीतआतापर्यंत बराच मागे होता मात्र आता विविध प्रकल्पांद्वारे हे मागासलेपण दूर करण्याचा प्रयन्त केला जात आहे ज्यादारे  ईशान्य भारतातील  प्रत्येक राज्याच्या राजधानीपर्यंत रेल्वेसेवा पोहोचवणे तसेच या आधी असलेल्या आणि डिझेलवर चालणाऱ्या रेल्वेमार्गाचे वेगाने विद्युतीकरण करणे  ही कामे करणे होत आहे या  विकास कामांच्या यादीत नुकतेच दोन कामे झाल्याचे बातम्यातून स्पष्ट झाले समर्थ रामदास स्वामी यांच्या जे जे आपणाशी ठाव ते ते सकळांसी सांगावे शहाणे करून सोडावे सकल जन या उक्तीनुसार त्याविषयी सांगण्यासाठी आजचे लेखन         तर मित्रानो मणिपूर या राज्याची राजधानी असलेले इंफाळ शहर  रेल्वेचा नकाश्यावर आणण्यासाठी वेगात कामे सुरु आहेत रेल्वेचा एका अंदाजनुसार डिसेंबर २०२३ पर्यंत ही कामे पूर्ण होऊन सन २०२४पासून या मार्गावर रेल्वे धावायला लागेल आजमितीस हा मजकूर लिहीत असताना इंफाळ या शहरापासून १११ किमी दूर असणाऱ्या जिरीबाम पर्यंत रेल्वे धावत आहे आणि सध्या जिरीबाम ते इंफाळ या मार्गाचे काम सुरु आहे या १११ किमी अंतरात ११ स्थानके प्रस्तावित आहेत या १११