पोस्ट्स

जानेवारी ९, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

छञपती शिवाजी महाराज ,स्वातंञ्यवीर सावरकर आणि आजची मराठी

इमेज
छञपती शिवाजी महाराज आणि स्वातंञ्यवीर सावरकर हे दोघे महाराष्ट्राचे आराध्यदैवत . दोघांनी सामान्य माणसांचा विचार केला .छञपती शिवाजी महाराज आणि स्वातंञ्यवीर सावरकर यांचा कालखंड जरी भिन्न असला तरी अनेक बाबतीत त्यांचे विचार समानच असल्याचे आपणास जाणवते . दोघांकडे भविष्याकडे डोळसपणे बघण्याची दृष्टी होती .  छञपती शिवाजी महाराजांनी हे टोपीवाले दिसतात तेव्हढे साधे नाहीत त्यांचापासून जपून राहिले पाहिजे .असे इंग्रजांबाबत मत व्यक्त केले होते आणि या पुढील काळात हल्ले समुद्रामार्गे होतील तिही सिध्दता आपण करायला पाहिजे असेही मत व्यक्त केले होते .इंग्रजांनी केलेले नुकसान सर्वश्रुत आहेच . अजमल कसाब आणि मार्च 1993 च्या स्फोटामुळे समुद्राचा धोका आपणास लक्षात आलाच आहे .  लष्करीकरणाविषयी आणि चिनविषयक स्वातंञ्यवीर सावरकरांची मते आज आपण प्रत्यक्षात उतरतांना बघतो आहोतच. या दोघाचे अजून एक समान कार्य म्हणजे त्यानी मराठी भाषेविषयी केलेले कार्य  छञपती शिवाजी महाराजांच्या काळात तत्कालीन मराठीत अनेक फारशी शब्दांचा वापर होत होता (सध्या फारशीची जागा इंग्रजी घेतीये ) छञपती शिवाजी महाराजांनी त्या फारशी शब्दांना अने