पोस्ट्स

ऑगस्ट ३०, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

गणेशाची साडेतीन पीठे

इमेज
  आपल्या महाराष्ट्रात साडेतीन शक्तिपीठे म्हंटली की प्रामुख्याने  देवीची शक्तिपीठे आठवली जातात . मात्र आपल्या महाराष्ट्रात गणपतीची देखील शक्ती पीठे आहेत . सध्याच्या गणेशोत्सवाच्या  काळात त्यांची माहिती करून घेउया .या साडेतीन गणपतीच्या दर्शनाने मोठे पुण्य मिळते अशी श्रद्धा आहे . भगवान गणपतीने मयूरेश्वराच्या वध केला असता त्याचे शरीर ज्या ज्या ठिकाणी पडले  त्या त्या  ठिकाणी ही पुण्यक्षेत्रे निर्माण झाली अशी कथा सांगितली जाते .       मोरगाव - 'भूस्वानंदपूर ' म्हणजेच आजचे प्रचलित 'मोरगाव'. गाणपत्य सांप्रदायाचे आद्यपीठ मोरगाव. या क्षेत्राचा आकार मोरासारखा आहे. ब्रम्ह, विष्णू, महेश, सूर्य व शक्ती या पंचदेवांनी ॐकार स्वरूपी गणेशाची तिथे स्थापना केली. उन्मत्त सिंदुरासुराचा वध करून त्याचा सेनापती कमलासूर याचाही वध श्री गणेशाने केला. कमलासूराचे शीर  जमिनीत गाडून त्याच्यावर तो आरूढ होऊन बसला. आजही त्याचे प्रतिक म्हणून  विजयादशमीच्या दिवशी मोठा   उत्सव होतो. येथे गणेशापुढे नंदी आहे हे याचे वैशिष्ठ्य.   पुण्यापासून ५२ कि.मी. वर मोरगाव क्षेत्र आहे.पुणे ते मोरगाव एस.टी. आहे. राजूर