पोस्ट्स

मार्च १२, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पाकिस्तानात नक्की चाललंय तरी काय ?

इमेज
               सध्या आपल्याकडील बहुसंख्य माध्यमे भारतातील पाच राज्यातील झालेल्या  निवडणुका ,  आणि महाराष्ट्रातील राजकीय नेत्याच्या आरोप प्रत्यारोपाचा बातम्या देण्यात मग्न असताना  पाकिस्तानात नक्की चाललंय तरी काय ? अशी शंका उत्पन्न व्हावी अश्या बातम्या सध्या विविध इंग्रजी माध्यमात येत आहे . पाकिस्तान आपले  शत्रू राष्ट्र आहे तसेच तो आपल्याबरोबर मोठी सीमा शेअर करतो आपली जम्मू , अमृतसर पठाणकोट आदी महत्वाची शहरे भारत पाक सीमेपासून हाकेच्या अंतरावर आहेत त्यामुळे तेथील घडामोडी आपणस माहिती असणे आवश्यक आहे त्या साठीच आजचे लेखन              पाकिस्तानमध्ये हा मजकूर लिहीत असताना   पंतप्रधानपदी  इम्रान खान आहेत .पाकिस्तानमधील विरोधी पक्षांनी त्यांच्या विरोधात आंदोलन सुरु केले आहे.  पाकिस्तानमधील सर्वात मोठे शहर पाकिस्तानची १९६३ पर्यंतची राजधानी त्यांची सध्याची आर्थिक राजधानी असलेल्या कराची या शहरातून मोठी राजकीय रॅली पाकिस्तानची १९६४ पासूनची  राजधानी जी त्यावेळच्या पूर्व पाकिस्तानमधून मिळणाऱ्या कारातून  बांधण्यात आली (त्या वेळचा पूर्व पाकिस्तान म्हणजे आजचा बांगलादेश )  त्या इस्लामाबाद या शहरात आणून

अन्य एसटी वेगाने पुढे जात आहेत?आणि आपण!

इमेज
      एखाद्या व्यक्तीच्या परीस्थितीत प्रचंड बदल झाल्यास काय होतात तू , काय झालास तू ? असे म्हणण्याची आपल्याकडे पद्धत आहे. गेल्या काही दिवसातील महाराष्ट्र एसटीविषयीच्या आणि आपल्या भारतातील इतर राज्यातील एसटीविषयक बातम्या ऐकल्या की , हे विधान आपल्या महाराष्ट्र एसटीला तर लागू पडत नाहीना ? असी दाट शंका येते.       एकेकाळी भारतातील इतर एसटी महामंडळाला महाराष्ट्र एसटी महामंडळाचा आदर्श होता. महाराष्ट्र एसटी सारखी सेवा आपल्या राज्यातील जनतेला देण्याचा प्रयत्न एसटीने करावा , असे केंद्राकडून इतर एसटीला सांगण्यात येत असे. आपल्या बसेसच्या रंगसंगतीशी मिळतीजूळती रंगसंगती आंध्रप्रदेश एसटी ठेवण्याचा प्रयत्न करत असे. आपल्या महाराष्ट्र एसटीने 1962 आणि 1965 च्या युद्धात शत्रूविरुद्ध लढण्यासाठी लष्कराला विक्रमी वेळात बस बांधून दिली होती. 1983 साली नवी दिल्लीत झालेल्या आशियाई खेळासाठी आलेल्या परदेशी खेळाडूंना आरामदायी प्रवास घडवण्यासाठी आपल्या महाराष्ट्र एसटीकडून विशेष बसेस बांधण्यात आल्या होत्या. त्यावेळच्या सर्वात आरामदायी बसेस म्हणून त्या ओळखल्या जात.आपण त्यांना हिरकणी किंवा एशियाड या नावाने आपण ओळखतो.