पोस्ट्स

जानेवारी ४, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

हवामान बदल समस्त मानवजातीसमोरील संकट

इमेज
  आपण महाराष्ट्रीय लोक विविध राजकारणी लोकांनी   महनीय व्यक्तिमत्वाबाबत केलेली विधाने,ज्यामुळे सामाजिक शांतता भंग होणे  पूर्वी एम एस सी बी या नावाने परिचित असलेल्या मंडळाच्या जे आता चार वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये विभाजित केले आहे त्यांच्या कर्मचाऱ्यांनी स्वहितासाठी केलेला संपामुळे त्रस्त असताना जगभरात मात्र लोक हवामानाच्या  लहरीपणामुळे त्रासलेले आहेत जगातील एकमेव महाशक्ती सर्वात विकसित देश म्हणून ज्या अमेरिकेचा उल्लेख होतो त्याअमेरिकेच्या प्रशासनाने देखील या हवामानाच्या लहरीपांपुढे गुडघे टेकले आहेत .अत्यंत विकसित समजल्या जाणाऱ्या अमेरिकेत सुद्धा अचानक मोठ्या प्रमाणत आलेल्या शीतलहरींमुळे नागरिकांचा बळी जाण्याचा घटना घडला यावरून निसर्गाने आपली ताकद काय आहे ? हे जगाला एकप्रकारे दाखवून दिले  आहे असेच म्हणावे लागेल  गेल्या डिसेंबरचा शेवटचा आठवडा अमेरिका आणि युनाटेड किंगडम या दोन देशांसह संपूर्ण पश्चिम युरोपासाठी हवामानाचा विचार करता अत्यंत नरकामय यातना देणारा ठरला अमेरिका देशाचा पूर्वेकडच्या किनाऱ्यावर (अटलांटिक महासागराचा किनारा ) कॅनडा देशाच्या मध्यापर्यंत बहुदा शतकात येणारे शीतलहरींचे वादळ

पाश्चात्त्यांचे चुकलेले भविष्य

इमेज
            आपला भारत १९४७ साली स्वतंत्र्य झाला त्यावेळी तत्कालीन अमेरिकी अध्यक्ष पश्चिमी युरोपीय देशातील प्रमुखांनी आपलया भारताताबत अंदाज व्यक्त करताना इतक्या विविधता असणाऱ्या देशाचे किमान चार ते पाच तुकडे पडतील या उलट पाकिस्तान या देशात किमान एक धर्म तरी सामान असल्याने तो देश मोठ्या प्रमाणत प्रगती करेल असे अंदाज व्यक्त केले होते . आज ७५ वर्षानंतर पाश्चात्यांचे अंदाज पूर्णतः चुकल्याचे स्पष्ट होत आहे .     गेल्या ७५ वर्षात भारत एक मोठी आर्थिक ताकद म्हणून उदयास आला आहे . १९९१ चा दुर्देवी अपवाद वगळता भारताला आंतराष्ट्रीय नाणेनिधीकडे मदत मागावी लागलेली नाही .१९७५ नंतरच्या   दोन वर्षांचा अपवाद वगळता भारतात लोकशाही व्यवस्थित सुरु आहे काँग्रेस नंतर भाजपा सारख्या अत्यंत भिन्न विचारसरणीच्या सरकाकडे शांततेत सत्तानंतरण झाले आहे . भारताच्या फक्त इंदिरा गांधी यांची पंतप्रधानपदी असताना हत्या झाली आहे (राजीव गांधी यांची हत्या झाली तेव्हा  ते पंतप्रधान नव्हते ) भारताचा एक इंच जमीन देखील स्वतंत्र झालेली नाही याच्या पूर्ण उलट स्थिती पाकिस्तानची आहे जगात संयुक्त राष्ट्रसंघाची मान्यता आहे असे जगात २१० दे