पोस्ट्स

ऑक्टोबर २४, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अशांत पुर्वांचल

इमेज
आपली मराठी माध्यमे  काहीश्या अनावश्यक वाटणाऱ्या मुद्द्यांभोवती चर्चाचर्वण करत असताना, आपल्या भारताच्या अतिपुर्वेकडील राज्य असणाऱ्या दोन राज्यांमध्ये सीमा निश्चिती प्रकरणी मोठा वादंग निर्माण झाला आहे. या वादंगामुळे एका राज्यात अशंतः जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा खंडीत झाला आहे.सीमावाद उफळून आलेली  ती राज्ये आहेत आसाम आणि मिझोराम . आणि यामध्ये अशंतः भरडले जाणारे राज्य आहे ,मिझोराम .                                    या वादाला कारणीभूत आहे, भारतावर ब्रिटीशांचे शासन असताना केलेल्या दोन तरतूदी . सन 1875मध्ये केलेल्या तरतूदीनूसार आसाम राज्याला अधिकची जमिन मिळते, तर याच भागासाठी केलेल्या 1933च्या तरतूदीनूसार मिझोराम या राज्याला जास्तीच्या भूमीचा लाभ होतो. कोणती तरतूद प्रमाण मानायची यावरुन दोन्ही राज्यामध्ये 1987 पासून म्हणजेच मिझोराम या राज्याला पुर्ण राज्याचा दर्जा मिळाल्यापासून तीव्र  मतभेद आहेत. दोन्ही राज्यांचा या बाबत भावना तीव्र असल्याने याबाबत सातत्याने वाद निर्माण होत असतो. यावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही राज्यांनी वाद असणाऱ्या क्षेत्रात मानवी वस्ती न करण्याची भूमीका घेतली आहे.