पोस्ट्स

मार्च ३, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बुद्धीच्या खेळात महाराष्ट्राची दैदिप्तमान कामगिरी

इमेज
      पहिल्या क्रमांकावरील दिव्या देशमुख  सध्या मराठीतील विविध वृत्तवाहिन्यामध्ये रशिया युक्रेन यांच्यातील युद्धाच्या बातम्या किंवा राजकीय क्षेत्रातील बातम्या देत असताना,  बुद्धीच्या खेळात अर्थात बुद्धिबळात महाराष्ट्रीयन बुद्धिबपटूंनी अत्यंत दैदिप्तमान कामगिरी केली आहे नुकत्याच भुवनेश्वर येथे झालेल्या,  ५८ व्या  राष्ट्रीय खुल्या  वरिष्ठ महिला बुद्धिबळ स्पर्धेत पहिल्या दोन  क्रमांकावर महाराष्ट्राच्या बुद्धिबळतारका आहेत नागपूरच्या दिव्या देशमुख यांनी ९ फेऱ्यांममध्ये ७ विजय आणि २ डावात बरोबरी यांच्यासह एकूण ८ गुण मिळवत राष्ट्रीय महिला  वरिष्ठ गटात विजेतेपदाचा मान मिळवला . त्या या स्पर्धेत अपराजित राहिल्या हे विशेष.  या विजेतेपदामुळे १७ वर्षीय वूमेन ग्रँडमास्टर असलेल्या   दिव्या देशमुख यांनी गेल्या वीस वर्षातील सर्वात तरुण राष्ट्रीय महिला विजेती होण्याची कामगिरी केली आहे यावेळी त्यांनी आपल्या फिडे गुणांकन २५ ने वाढवले सुद्धा . तसेच आतापर्यंतच्या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वाधिक रक्कमेचे रोख बक्षीस देखील मिळवले . त्यांना साडेपाच लाख रुपये बक्षीस रूपाने मिळाले . त्यांनी पहिल्या फेरीत मध्यप्र